दीर्घकाळापासून कॅन्सरशी झुंज देत असलेल्या बॉलिवूड दिग्गज अभिनेता इरफान खान याचे आज निधन झाले. काल अचानक तब्येत बिघडल्यामुळे इरफानला कोकिलाबेन रुग्णालयात आयसीयूमध्ये भरती करण्यात आले होते. इरफान लवकर बरा व्हावा, यासाठी चाहते प्रार्थना करत असताना त्याच्या मृत्यूची बातमी आली आणि चाहते शोकसागरात बुडाले. बॉलिवूडमध्येही शोककळा पसरली. क्रीडा विश्वातूनही त्याला श्रद्धांजली वाहिली जात आहे. महान फलंदाज सचिन तेंडुलकर, माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, मुख्या प्रशिक्षक रवी शास्त्री, मोहम्मद कैफ, इरफान पठाण आदी सर्वांनी इरफान खानला श्रंद्धांजली वाहिली.
सचिन तेंडुलकरनं ट्विट केले की,''''इरफान खान यांच्या जाण्याच्या बातमीनं दुःख झालं. माझ्या आवडत्या अभिनेत्यांपैकी तो एक होता आणि त्याचे सर्व चित्रपट मी पाहीले. अंग्रेजी मीडियम हा त्याचा अखेरचा चित्रपट ठरला. तो अगदी सहजतेनं अभिनय करायचा. त्याच्या आत्म्याला शांती मिळो.''
त्या वेदना मी समजू शकतो..., इरफानच्या जाण्यानं भावुक झाला Yuvraj Singh
इरफान खान यांचे काम अमर राहील, क्रीडा विश्वानं वाहिली श्रद्धांजली
इरफान गेल्या वर्षी उपचारामुळे झाला होता पूर्णपणे बरा, या आजाराला दिली होती झुंज
मै आपके साथ हूँ भी और नहीं भी...! इरफानचे ते शब्द ठरले अखेरचे...!!
नाही राहिला माझा प्रिय मित्र...सुजीत सरकारने व्यक्त केली खंत, बॉलिवूडही हळहळलं