Join us  

सुट्टीवरून परतल्यानंतर Virat Kohli-Anushka Sharma यांच्या हॉस्पिटलला चकरा, नेमकं झालं तरी काय?

Virat Kohli-Anushka Sharma  - भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) सध्या विश्रांतीवर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 3:33 PM

Open in App

Virat Kohli-Anushka Sharma  - भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) सध्या विश्रांतीवर आहे. आयपीएल २०२२नंतर बीसीसीआयने विराटसह रोहित शर्मा व जसप्रीत बुमराह या सीनिअर खेळाडूंना विश्रांती दिली. त्यामुळे हे खेळाडू दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या ट्वेंटी-२० संघाचे सदस्य नाहीत. रोहित त्याच्या कुटुंबीयांसह फिरायला गेला. विराट व अनुष्का शर्माही नुकतेच कुठेतरी फिरायला गेले होते आणि त्यांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून चाहत्यांना अपडेट्सही दिले होते. हे दोघंही सोमवारी मुंबईत परतले... पण, काही तासांत या दोघांना मुंबईच्या हॉस्पिटलच्या चकरा मारताना paparazzi ने पाहिले आणि त्यांनी व्हिडीओही पोस्ट केला.

दोनच दिवसांपूर्वी विराट व अनुष्का यांनी त्यांच्या व्हेकेशनचे फोटो पोस्ट केले होते. अचानक त्यांना हॉस्पिटलबाहेर पाहून चाहते चिंतेत पडले आहेत. घाबरण्याचं काही कारण तर नाही ना, असा प्रश्न त्यांना पडला आहे. पण, हॉस्पिटलच्या पार्किंगमधून गाडीत बसून बाहेर येणाऱ्या अनुष्काच्या चेहऱ्यावर आनंद दिसला. त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही हे स्पष्ट आहे. पण, हे दोघं हॉस्पिटलला का गेले होते, यामागचं कारण अजून गुलदस्त्यात आहे.  

विराट कोहली आता इंग्लंड दौऱ्यासाठी सज्ज झाला आहे. १६ जूनला भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. रोहित शर्मा व जसप्रीत बुमराह यांचेही या दौऱ्यातून पुनरागमन होणार आहे. विराटचा फॉर्म हा भारतासाठी चिंतेचा विषय बनला असला तरी या दौऱ्यावर तो चांगली कामगिरी करेल, असा विश्वास चाहत्यांना आहे. नोव्हेंबर २०१९नंतर विराटला एकही आंतरराष्ट्रीय शतक झळकावता आलेले नाही.     

भारत-इंग्लंड मालिकेचे वेळापत्रक

  • पाचवी कसोटी - १ ते ५ जुलै २०२२, एडबस्टन

 ट्वेंटी-२० मालिका 

  • पहिला सामना - ७ जुलै २०२२, एजीस बॉल
  • दुसरा सामना - ९ जुलै २०२२, एडबस्टन
  • तिसरा सामना - १० जुलै २०२२, ट्रेंट ब्रिज 

वन डे मालिका 

  • पहिला सामना - १२ जुलै २०२२, ओव्हल
  • दुसरा सामना - १४ जुलै २०२२, लॉर्ड्स
  • तिसरा सामना - १७ जुलै २०२२- ओल्ड ट्रॅफर्ड  

इंग्लंडविरुद्धच्या  सामन्यासाठी भारताचा कसोटी संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), लोकेश राहुल ( उप कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत, के एस भरत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा 

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्माभारत विरुद्ध इंग्लंड
Open in App