Athiya Shetty Mumbai Indians KL Rahul, IPL 2022: "अथिया शेट्टीचा एक्स-बॉयफ्रेंड मुंबई इंडियन्समधून खेळतोय की काय?"; लोकेश राहुलच्या सलग दुसऱ्या शतकानंतर सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल

राहुलच्या लखनौ संघाने मुंबईला दोन्ही सामन्यात केलं पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 06:02 PM2022-04-25T18:02:44+5:302022-04-25T18:04:01+5:30

whatsapp join usJoin us
Is Athiya Shetty Ex Boyfriend playing from Mumbai Indians Team Social media memes comments after KL Rahul second century IPL 2022 MI vs LSG | Athiya Shetty Mumbai Indians KL Rahul, IPL 2022: "अथिया शेट्टीचा एक्स-बॉयफ्रेंड मुंबई इंडियन्समधून खेळतोय की काय?"; लोकेश राहुलच्या सलग दुसऱ्या शतकानंतर सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल

Athiya Shetty Mumbai Indians KL Rahul, IPL 2022: "अथिया शेट्टीचा एक्स-बॉयफ्रेंड मुंबई इंडियन्समधून खेळतोय की काय?"; लोकेश राहुलच्या सलग दुसऱ्या शतकानंतर सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Athiya Shetty Mumbai Indians KL Rahul, IPL 2022: मुंबई इंडियन्स विरूद्ध आपला यंदाच्या हंगामातील दुसरा सामना खेळणारा संघ लखनौ सुपर जायंट्सने रविवारी पुन्हा एकदा विजय मिळवला. लखनौचा हा मुंबई विरूद्धचा दुसरा विजय ठरला. लखनौकडून खेळताना राहुलने कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. त्याने मुंबई इंडियन्स विरूद्धच्या दोन्ही सामन्यात शतक (१०३) ठोकले आणि संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. त्याच्या या पराक्रमानंतर त्याची गर्लफ्रेंड अथिया शेट्टीबाबत काही भन्नाट कमेंट्स आणि मीम्स सोशल मीडियावर पाहायला मिळाले.

अथिया शेट्टी मैदानात लखनौ संघाला आणि राहुलला चीअर करायला येत होती, त्यावेळी राहुलची बॅट म्हणावी तशी तळपली नाही. अथिया, तिचे वडील बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीसोबत स्टेडियममध्ये मॅच पाहायला आली असताना तर राहुल पहिल्या चेंडूवर क्लीन बोल्ड झाला. त्यानंतर अथिया पुन्हा स्टेडियममध्ये दिसली नाही, आणि योगायोगाने त्यानंतरच्या दोन्ही सामन्यात मुंबई इंडियन्सविरूद्ध राहुलने शतक ठोकले. त्यानंतर काही युजर्सने काही मजेशीर कमेंट्स आणि मीम्स शेअर केल्याचे दिसून आले. एकाने लिहिले की, 'अथिया शेट्टीचा एक्स बॉयफ्रेंड तर मुंबईच्या संघातून खेळत नाहीये ना..', तर दुसऱ्याने लिहिले, अथिया स्टेडियम मध्ये नसते, त्यावेळी राहुल प्रतिस्पर्धी संघासाठी खूपच घातक ठरतो.' पाहूया काही निवडक ट्वीट्स-

--

--

दरम्यान, मुंबईच्या संघाला यंदाच्या हंगामात एकही सामना जिंकता आला नाही. कालच्या सामन्यातील पराभवाबरोबरच मुंबईच्या प्ले-ऑफ्सच्या आशा मावळल्या. ड्रेसिंग रूममध्ये पूर्णपणे शांततेचे वातावरण दिसून आले. लोकेश राहुलने ६० चेंडूत नाबाद १०३ धावा कुटल्या. प्रत्युत्तरात मुंबईकडून कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.

Web Title: Is Athiya Shetty Ex Boyfriend playing from Mumbai Indians Team Social media memes comments after KL Rahul second century IPL 2022 MI vs LSG

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.