CSK Playoffs Scenario, IPL 2022: Mumbai Indians नंतर यंदाच्या हंगामातील सर्वात वाईट कामगिरी करणारा संघ म्हणजे चेन्नई सुपर किंग्ज (CSK). चेन्नईला स्पर्धेत सहाव्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. सोमवारी झालेल्या सामन्यात रवींद्र जाडेजाच्या नेतृत्वाखालील CSK संघाचा ११ धावांनी पराभव झाला. सहा पराभवांमुळे CSK चा संघ गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. पंजाब किंग्जविरुद्धच्या पराभवानंतर CSK साठी प्ले-ऑफचा मार्ग अधिक कठीण झाला आहे. चेन्नईला अजून सहा सामने खेळायचे आहेत. जर CSK ने त्यांचे उर्वरित सर्व सहा सामने जिंकले, तर त्यांच्याकडे आठ विजय आणि १६ गुण असतील. तसे केल्यास त्यांचा प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवण्याचा मार्ग थोडा सोपा होण्याची शक्यता आहे.
नेट रनरेटचा फटका बसण्याची शक्यता
चेन्नई सुपर किंग्जला ६ पैकी केवळ ५ सामने जिंकता आले, तर त्यांचे केवळ १४ गुण होतील. मग नेट-रनरेटवर जाऊन प्रकरण अडकेल आणि CSK ला इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून राहावे लागेल. CSK ला आता प्लेऑफमध्ये जाण्याची आशा कायम ठेवायची असेल तर उर्वरित सहा सामने जिंकावे लागतील, हे सध्या अधिक स्पष्ट आहे. त्याचबरोबर त्यांना आपल्या नेट-रनमध्येही सुधारणा करावी लागेल. CSK चा नेट रन रेट सध्या उणेमध्ये (-०.५३४) आहे.
CSK चे उर्वरित सामने-
१ मे - विरुद्ध हैदराबाद, पुणे
४ मे - विरुद्ध बंगलोर, पुणे
८ मे - विरुद्ध दिल्ली, नवी मुंबई
१२ मे - विरूद्ध मुंबई, वानखेडे, मुंबई
१५ मे - विरुद्ध गुजरात, वानखेडे, मुंबई
२० मे - विरुद्ध राजस्थान, ब्रेबॉर्न, मुंबई
पंजाबविरूद्धच्या सामन्यात काय घडलं?
CSK ने टॉस जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजी दिली. शिखर धवनने सलामीला उतरत संपूर्ण २० षटके खेळून काढली. त्याने ८८ धावांची नाबाद खेळी करत संघाला १८७ धावांपर्यंत मजल मारून दिली. प्रत्युत्तरात अंबाती रायुडूने तुफानी खेळी करत ७८ धावा केल्या. पण त्याला दुसऱ्या फलंदाजांची साथ न मिळाल्याने पंजाबचा ११ धावांनी विजय झाला.
Web Title: is CSK also out of IPL 2022 Playoffs race after Mumbai Indians see statistics mathematics net run rate points table
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.