sachin tendulkar’s statue - क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण बुधवारी ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी दस्तुरखुद्द सचिनसह त्याचे कुटुंबीय, बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार, बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला, सचिव जय शाह, खजिनदार आशिष शेलार आणि मुंबई क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. एकूण २२ फूट उंचीचा असलेला सचिनचा हा पुतळा सरळ दिशेने हवेत फटका मारतानाच्या शैलीत आहे. विजय मर्चंट स्टँड आणि सचिन तेंडुलकर स्टँडच्या मधोमध हा पुतळा बसविण्यात आला असून संपूर्ण पुतळा ब्राँझचा आहे.
आधी मिठी अन्...! विराट कोहलीने मैदानावर उतरून मोडला सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम, Video
या कार्यक्रमानंतर सचिन तेंडुलकरने वानखेडे स्टेडियमवरील आपल्या पहिल्या भेटीची मजेशीर आठवण सागितली. 'मी दहा वर्षांचा असताना पहिल्यांदा वानखेडे स्टेडियमवर आलो होतो आणि तेव्हा मला लपवून आणण्यात आले होते,' अशी आठवण सचिनने सांगितली. पण, आज या पुतळ्यावरून सोशल मीडियावर मीम्स व्हायरल झाले आहेत. हा सचिनचा पुतळा आहे की स्टीव्ह स्मिथचा असे अनेकांनी विचारले आहे.