अहमदाबाद : आयपीएलमध्ये जगातील सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाजांचा सामना केल्यामुळे इंग्लंडविरुद्ध पदार्पणात बेधडक खेळी करणे सोपे झाल्याचे मत टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण करीत सामनावीराचा किताब जिंकणारा युवा फलंदाज इशांत किशन याने व्यक्त केले. इशाने ५६ धावांचे योगदान देत रविवारी भारताचा विजय साकारला. (Ishaan Kishan said that IPL has given him the courage to play)
सामन्यानंतर इशान म्हणाला, ‘नेट्समध्ये मुंबई इंडियन्सचे वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह यांच्या वेगवान माऱ्यावर फटकेबाजी करताना आत्मविश्वास उंचावतो. आयपीएलमध्ये जगातील अनेक वेगवान गोलंदाजांना खेळण्याची संधी मिळत असल्याने पुढे अशा माऱ्याची सवय होते. याचा मला फायदा झाला. संघ व्यवस्थापनाने मला दडपण न घेता खेळण्यास प्रोत्साहन दिले. सामन्याआधीच मला मोकळेपणे खेळण्यास सांगण्यात आले होते. आयपीएलमध्येही असाच खेळतो.’
कोहलीसह केलेल्या निर्णायक भागिदारीबाबत ईशान म्हणाला की, ‘पहिला आंतरराष्ट्रीय सामना असल्याने सुरुवातीला थोडा नर्व्हस होतो. मात्र, भारताची जर्सी घातल्यानंतर दडपण नाहीसे झाले. देशासाठी सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याचे भाव मनात असतात. याआधी मी कोहलीसोबत कधीही खेळलो नव्हतो. रविवारी पहिल्यांदाच त्याच्यासोबत खेळलो, हे माझ्यासाठी गौरवास्पद होते. विराटमधील ऊर्जा आणि मैदानावरील उपस्थिती प्रेरणादायी असते. मी विराटकडून बऱ्याच गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करेन.’ असे इशान किशनने सांगितले.
Web Title: Ishaan Kishan said that IPL has given him the courage to play
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.