IND vs SL 2nd T20I : भारतीय संघाने दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात ७ विकेट्स व १७ चेंडू राखून श्रीलंकेला नमवले आणि तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. भारताने सलग ११ ट्वेंटी-२० सामने जिंकून इतिहास घडवला आहे आणि ही आतापर्यंतची भारताची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. श्रीलंकेच्या ५ बाद १८३ धावांचा पाठलाग करताना भारताने रोहित शर्मा व इशान किशन यांच्या विकेट झटपट गमावल्या. पण, श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer), संजू सॅमसन ( Sanju Samson) आणि रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) यांनी दमदार खेळी करून भारताचा विजय पक्का केला. या सामन्यात भारताचा सलामीवीर इशान किशन ( Ishan Kishan) याच्या हेल्मेटवर चेंडू आदळला होता आणि प्राथमिक उपचार घेऊन तो मैदानावर खेळला. पण, सामन्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं.
दैनिक जागरणने दिलेल्या माहितीनुसार इशान किशनला धरमशाला येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये आयसीयू वॉर्डात दाखल केले गेले आहे. तेथे सीटी स्कॅन केल्यानंतर त्याला आयसीयू वॉर्डात भरती केलं गेलं होतं. पण, त्यात घाबरण्यासारखं काही नसल्याचे, सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. इशानला आता साध्या वॉर्डात हलवण्यात आले असून बीसीसीआय सकाळी त्याच्याबाबत अपडेट्स देतील.
भारताच्या डावातील चौथ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर इशानला दुखापत झाली. लाहिरू कुमाराने टाकलेला बाऊन्सर थेट इशानच्या हेल्मेटवर आदळला आणि त्यानंतर तो मैदानावर बसला. प्राथमिक उपचार घेऊन त्याने पुन्हा फलंदाजी केली. मात्र, १५ चेंडूंत १६ धावा करून तो माघारी परतला. त्यानंतर इशानला स्कॅनसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आल्याचे वृत्ता दैनिक जागरणने दिले. डोक्यावर मार लागल्यानंतर स्कॅन केलं जातं.
Web Title: Ishan Kishan admitted to ICU ward after getting hit on head, he suffers blow on helmet by Lahiru Kumara bouncer in second T20I vs Sri Lanka, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.