Join us  

इशान किशन, श्रेयस अय्यर यांच्यावर BCCI कठोर कारवाईच्या तयारीत; निर्णय झालाय फक्त...

 राहुल द्रविड, अजित आगरकर आणि जय शाह यांनीही खेळाडूंना रणजी करंडक स्पर्धेत खेळण्याचा सल्ला दिला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 2:39 PM

Open in App

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरून मानसिक थकवा सांगून दौऱ्यातून सुट्टी मागणारा इशान किशन ( Ishan Kishan) गायब झाला तो झालाच... त्याला देशांतर्गत क्रिकेट खेळण्याच्या सूचना वारंवार केल्या गेल्या, परंतु त्याकडे त्याने दुर्लक्ष केले.. तशीच चूक श्रेयस अय्यरकडूनही ( Shreyas Iyer) झाली. तंदुरुस्त असूनही तो आजपासून सुरू झालेल्या रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत मुंबईकडून खेळला नाही. त्यामुळे आता BCCI ची सहनशक्ती संपली आहे आणि आता त्यांच्याकडून या दोन्ही खेळाडूंवर कठोर कारवाईचे संकेत मिळत आहेत. 

देशांतर्गत क्रिकेटकडे पाठ फिरवणाऱ्या इशान व श्रेयस यांना बीसीसीआय केंद्रीय करारातून वगळणार असल्याचे चिन्ह मिळत आहे. अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने काही दिवसांपूर्वी २०२३-२४च्या करारबद्ध खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. इशान व श्रेयस हे दोघंही रणजी करंडक स्पर्धेतील एकही सामना खेळलेले नाहीत. आफ्रिका दौऱ्यावरून माघारी परतल्यानंतर इशान काहीकाळ नॉट रिचेबल होता. श्रेयसला इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापासून वगळले गेले. 

श्रेयसने पाठ दुखीचं कारण सांगितलं, परंतु बीसीसीआयने तोपर्यंत मेडिकल बुलेटिन दिले नव्हते. पण, राहुल द्रविड, अजित आगरकर आणि जय शाह यांनीही खेळाडूंना रणजी करंडक स्पर्धेत खेळण्याचा सल्ला दिला होता. इशान व श्रेयस दोघांनीही या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे BCCI आता कठोर कारवाई करण्याच्या तयारीत आहे.

''निवड समिती प्रमुख अजित आगरकर याने २०२३-२४च्या सत्रासाठी केंद्रीय करारासाठीच्या खेळाडूंची निवड जवळपास निश्चित केली आहे आणि बीसीसीआय केंद्रीय करार लवकरच जाहीर करणार आहे. यामधून इशान व श्रेयस यांना वगळले जाण्याची शक्यता आहे. ही दोघंही देशांतर्गत क्रिकेट खेळलेले नाहीत,''असे सूत्रांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले.   

टॅग्स :इशान किशनश्रेयस अय्यरबीसीसीआय