मुंबई : सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-20 स्पर्धेत युवा फलंदाज-यष्टीरक्षक इशान किशनने एक इतिहास रचला आहे. कारण या सामन्यात अफलातून खेळी किशनने साकारली आणि अशी खेळी साकारणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे.
शुक्रवारी आंध्र प्रदेशमध्ये सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-20 स्पर्धा खेळवण्यात आली. या स्पर्धेत झारखंड आणि जम्मू काश्मीर यांच्यामध्ये एक सामना खेळवण्यात आला. या सामन्यात किशनने फक्त 55 चेंडूंत आठ चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने 100 धावांची खेळी साकारली. अशी कामगिरी करणारा किशन हा पहिला कर्णधार आणि यष्टीरक्षक ठरला आहे. जम्मू काश्मीरच्या आव्हानाचा झारखंडच्या संघाने सहज पाठलाग केला तो किशनच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना जम्मू काश्मीरच्या संघाने 168 धावा केल्या. यामध्ये सर्वाधिक 47 धावा जतीन वाधवाच्या होत्या. झारखंडकडून राहुल शुक्लाने यावेळी पाच विकेट्स मिळवले.
श्रेयस अय्यरची किर्ती महान, देशात ठरला अव्वल
मुंबईकर श्रेयस अय्यरने ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये भीमकाय पराक्रम केला. त्याने सय्यद मुश्ताक ट्वेंटी-20 क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी अफलातून खेळी साकारताना रिषभ पंत, सुरेश रैना आणि वीरेंद्र सेहवाग यांना मागे टाकले. त्यानं सिक्कीम संघाविरुद्धच्या सामन्यात 55 चेंडूंत 147 धावा चोपून काढल्या. ट्वेंटी- क्रिकेटमध्ये सर्वोत्तम वैयक्तिक खेळी करण्याचा विक्रम श्रेयसने आपल्या नावावर नोंदवला. याशिवाय त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली, परंतु मुंबई संघाला एका विक्रमाने अवघ्या 6 धावांनी हुलकावणी दिली.
अजिंक्य रहाणे व पृथ्वी शॉ यांना मुंबईला चांगली सुरुवात करून देता आली नाही. हे दोघेही फलकावर 22 धावा असताना माघारी परतले. मात्र, श्रेयस आणि सूर्यकुमार यादव यांनी चौकार-षटकारांची आतषबाजी करताना तिसऱ्या विकेटसाठी 216 धावांची भागीदारी केली. सूर्यकुमारने 33 चेंडूंत 8 चौकार व 2 षटकार खेचून 63 धावा चोपल्या. श्रेयसने 55 चेंडूंत 7 चौकार व तब्बल 15 षटकार खेचून 147 धावा कुटल्या. या दोघांच्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने 4 बाद 258 धावांचे डोंगर उभे केले. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा चोपणाऱ्या भारतीय संघात मुंबईने दुसरे स्थान पटकावले. या विक्रमात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 263 धावांसह आघाडीवर आहे. बंगळुरूनं 2013 मध्ये वॉरियर्सविरुद्ध 5 बाद 263 धावा चोपल्या होत्या.