Ranji Trophy: विराट संघाचा कर्णधार, इशान किशनही संघात; संजू सॅमसन मात्र प्रतिस्पर्धी

रणजी करंडक स्पर्धेची धामधूम, दोन संघांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 11:23 AM2022-12-13T11:23:00+5:302022-12-13T11:26:11+5:30

whatsapp join usJoin us
Ishan Kishan included in Ranji Trophy Ranchi Team Virat to lead Sanju Samson to play for Kerala | Ranji Trophy: विराट संघाचा कर्णधार, इशान किशनही संघात; संजू सॅमसन मात्र प्रतिस्पर्धी

Ranji Trophy: विराट संघाचा कर्णधार, इशान किशनही संघात; संजू सॅमसन मात्र प्रतिस्पर्धी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Ranji Trophy Ishan Kishan: JSCA स्टेडियमवर मंगळवारपासून सुरू होणाऱ्या केरळ विरुद्धच्या चार दिवसीय रणजी सामन्यासाठी झारखंड संघाची घोषणा करण्यात आली आहे. JSCAचे सचिव देवाशिष चक्रवर्ती यांनी सांगितले की, २० सदस्यीय संघाचे नेतृत्व विराट सिंह याच्याकडे सोपवण्यात आले आहे. तसेच वेगवान द्विशतक ठोकणारा इशान किशन याला संघात स्थान देण्यात आले आहे तर शाहबाज नदीम संघाचा उपकर्णधार असणार आहे.

झारखंड आणि केरळ यांच्यात जेएससीए स्टेडियमच्या मुख्य मैदानावर सामना रंगणार आहे. JSCA स्टेडियम हे झारखंड रणजी संघाचे होम ग्राउंड आहे. केरळकडून कॅप्टन संजू सॅमसन, सचिन बेबी, जलज सक्सेना खेळताना दिसणार आहेत. प्रेक्षकांनाही या सामन्याचा आनंद घेता येणार आहे. JSCAतर्फे प्रेक्षकांना वेस्ट डोअरमधून प्रवेश देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विंग डी मध्ये बसून प्रेक्षक सामन्याचा आनंद घेऊ शकतात.

ईशान किशनचे रांचीमध्ये जोरदार स्वागत

बांगलादेश विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावणारा स्टार फलंदाज इशान किशन सोमवारी रांचीला पोहोचला. मुंबईहून विमानाने तो बिरसा मुंडा विमानतळावर पोहोचला. तिथे विमानातील चाहत्यांनी आणि प्रवाशांनी त्याचे जंगी स्वागत केले. विमानतळाच्या अरायव्हल गेटबाहेर उभ्या असलेल्या लोकांनीही त्यांच्या नावाचा जल्लोष केला. चाहत्यांची नजर चुकवण्यासाठी व गर्दी टाळण्यासाठी त्याने हुडी घालून पळ काढण्याचा प्रयत्न केला होतास पण चाहत्यांनी त्याला ओळखलेच आणि त्यानंतर त्याच्या नावाचा जयघोष केला गेला.

इशान किशनने पत्रकारांच्या काही प्रश्नांनाही उत्तरे दिली. त्याचे मित्र मोनू कुमार आणि सत्यम हे इशानला घ्यायला गेले होते. शनिवारी १० डिसेंबरला बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या ३ वन डे मालिकेतील शेवटच्या सामन्यात इशानने सर्वात जलद द्विशतक झळकावले. त्याने २१० धावांची खेळी केली. दरम्यान, रांचीच्या संघात विराट सिंग आणि शाहबाज नदीम यांच्याशिवाय स्टार भारतीय क्रिकेटपटू इशान किशन, उत्कर्ष सिंग, नाझिम सिद्दीकी, आर्यमन सेन, सौरभ तिवारी, कुमार सूरज, कुमार देवब्रत, कुमार कुशाग्रा, अनुकुल रॉय, मनीषी, राहुल शुक्ला, आशिष कुमार, सुशांत मिश्रा, रौनक कुमार, पंकज कुमार, विकास सिंग, विनायक विक्रम आणि सुप्रियो चक्रवर्ती यांचा समावेश करण्यात आला आहे.

Web Title: Ishan Kishan included in Ranji Trophy Ranchi Team Virat to lead Sanju Samson to play for Kerala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.