Join us  

मानसिक थकव्याचे कारण पुढे करत ईशानची माघार; बीसीसीआयचे मौन

निराश झालेल्या ईशानला मानसिक थकवा आला असल्याचे सांगण्यात येत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2023 8:19 AM

Open in App

नवी दिल्ली : आगामी कसोटी मालिकेआधी भारताचा यष्टिरक्षक ईशान किशनने मानसिक थकव्याचे कारण पुढे करत दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून माघार घेतली आहे. संपूर्ण वर्षभरात प्रत्येक दौऱ्यात भारतीय संघात समावेश असलेल्या ईशानला अंतिम संघात खेळण्याची संधी फार कमी वेळा मिळाली. त्यामुळे निराश झालेल्या ईशानला मानसिक थकवा आला असल्याचे सांगण्यात येत आहे. 

२०२३ च्या वनडे विश्वचषकातही तो शुभमन गिलच्या अनुपस्थितीत पहिल्या दोन सामन्यांमध्ये खेळला होता. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात वनडे, टी-२० आणि कसोटी मालिकेसाठी त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्ष संधी त्याला मिळाली नाही. मंगळवारपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी लोकेश राहुलचाच यष्टिरक्षकासाठी जास्त विचार होत असल्याने अखेर मानसिक थकव्याचे कारण पुढे करत ईशान किशनने रिलीज करण्याची विनंती भारतीय संघव्यवस्थापनाकडे केली. त्याच्या विनंतीचा मान ठेवत संघव्यवस्थापनाने त्याला भारतात परतण्यासाठी हिरवा कंदील दिला आहे.

बीसीसीआयने मात्र याबाबत कोणतेही भाष्य केलेले नाही. १९८३च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचे कर्णधार कपिलदेव यांनी खेळाडूंना मानसिक थकवा दूर करण्यासाठी महत्त्वाचा सल्ला दिला होता. त्यांनी खेळाडूंनी आयपीएल खेळू नये, असे २०२० मध्ये म्हटले होते. 

भारताचा माजी खेळाडू अजय जडेजा यानेही ईशान किशनला दिल्या जाणाऱ्या वागणुकीवरून टीका केली होती. ईशानने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेतील ३ सामन्यांमध्ये ३६.६७ च्या सरासरीने ११० धावा केल्या होत्या. यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे.

 

टॅग्स :बीसीसीआयइशान किशन