Ishan Kishan on Rohit Sharma Captaincy: "Mumbai Indians असो किंवा टीम इंडिया असो, रोहित शर्मा मैदानात शिव्या देतो आणि नंतर म्हणतो..."; इशान किशनने सांगितला अनुभव

रोहित आणि इशान गेली दोन-तीन वर्षे एकत्र खेळत आहेत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 08:32 PM2022-04-06T20:32:41+5:302022-04-06T20:35:17+5:30

whatsapp join usJoin us
Ishan Kishan Shocking Revelation about Mumbai Indians Captain Rohit Sharma says he uses slang abusive words on ground IPL 2022 MI vs KKR | Ishan Kishan on Rohit Sharma Captaincy: "Mumbai Indians असो किंवा टीम इंडिया असो, रोहित शर्मा मैदानात शिव्या देतो आणि नंतर म्हणतो..."; इशान किशनने सांगितला अनुभव

Ishan Kishan on Rohit Sharma Captaincy: "Mumbai Indians असो किंवा टीम इंडिया असो, रोहित शर्मा मैदानात शिव्या देतो आणि नंतर म्हणतो..."; इशान किशनने सांगितला अनुभव

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Ishan Kishan on Rohit Sharma Captaincy, Mumbai Indians: जेव्हा कोणी मैदानात चूक करतो तेव्हा कर्णधार रोहित शर्मा कशी प्रतिक्रिया देतो हे भारतीय क्रिकेट संघाच्या (Team India) चाहत्यांना माहितीच आहे. चेतेश्वर पुजारा सारख्या वरिष्ठ फलंदाजांनापासून ते यजवेंद्र चहलसारख्या ज्युनियर खेळाडूंना मैदानावर रोहितच्या रागाचा सामना करावा लागला आहे. भारताचा उदयोन्मुख क्रिकेट स्टार आणि रोहितच्या मुंबई इंडियन्सचा सहकारी इशान किशन यानेही असाच एक किस्सा सांगितला. रोहित शर्मा मैदानात शिव्या देतो आणि नंतर खेळाडूंना काय सांगतो, याबद्दल त्याने मजेशीर गोष्ट सांगितली.

"मैदानावर जर दडपणाचं वातावरण असेल तर रोहित शर्मा खूप गंभीरपणे परिस्थिती हाताळत असतो. रोहित भाई मैदानात खेळाडूला सरळ शिवी देतो. पण नंतर त्यालाच वाईट वाटतं. मग तो आम्हाला सांगतो की एखाद्या सामन्यादरम्यान असे घडतं. तोंडून काही शब्द निघतात. पण तुम्ही मनावर घेऊ नका. आम्हीही त्याच्या शब्दांबद्दल कोणताही राग बाळगत नाही. सामन्यात अशा गोष्टी होतच असतात असं म्हणून आम्ही तो भाग तिथेच सोडून देतो", असा मजेशीर अनुभव इशान किशनने सांगितला.

"मुंबई इंडियन्स सोबतचं माझं पहिलंच वर्ष होतं. मी वानखेडेवर खेळत होतो. मी अगदीच नवीन होतो. सामन्यात चेंडू लवकर जुना करावा असा आमचा प्लॅन होता. त्यामुळे आम्ही चेंडू जमिनीवर फेकून तो लवकर जुना करायचो. त्यामुळे मी विचार केला की चेंडू जमिनीवर टाकूया आणि घरंगळत रोहित भाईला देऊया म्हणजे चेंडू जुना होईल आणि रोहित पण खुश होईल. पण झालं उलटंच. चेंडू त्याच्याकडे गेल्यावर त्याने टॉवेलने चेंडू पुसला आणि मला शिव्या दिल्या. पण नंतर सामना संपल्यानंतर तो मला म्हणाला की सामन्यात अशा गोष्टी होत राहतात, तू या गोष्टी पकडून बसू नकोस", अशी आठवण इशान किशनने सांगितली.

Web Title: Ishan Kishan Shocking Revelation about Mumbai Indians Captain Rohit Sharma says he uses slang abusive words on ground IPL 2022 MI vs KKR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.