Join us  

इशान किशन सापडला; दोन आठवड्यांपासून हार्दिक-कृणाल पांड्यासोबत आहे बडोद्यात

भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत विराट कोहली कधी परतणार हा प्रश्न जेवढा चाहत्यांना सतावतोय, तेवढाच इशान किशन ( Ishan Kishan) कुठे आहे, याचीही चिंता आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2024 9:42 PM

Open in App

भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत विराट कोहली कधी परतणार हा प्रश्न जेवढा चाहत्यांना सतावतोय, तेवढाच इशान किशन ( Ishan Kishan) कुठे आहे, याचीही चिंता आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर मानसिक थकवा सांगून इशान मायदेशात परतला. त्यानंतर काही दिवसांनी दुबईत तो मित्रांसोबत पार्टी करताना दिसला. त्याच्या या कृतीने बीसीसीआय नाराज असल्याची चर्चा रंगली. त्यात मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Rahul Dravid) यांनी इशानला देशांतर्गत क्रिकेट खेळून फॉर्म व फिटनेस सिद्ध करण्याचा सल्ला दिला. त्याहीनंतर तो झारखंडच्या रणजी संघात दाखल नाही झाला आणि तो नॉट रिचेबल असल्याचे क्रिकेट संघटनेकडून सांगितले गेले. अशाच इशान नेमका कुठेय याचा पत्ता लागला आहे.

क्रिकबजने दिलेल्या वृत्तानुसार यष्टीरक्षक-फलंदाज बडोद्यात वर्कआउट आणि सराव करताना दिसला आहे. २५ वर्षीय इशान गेल्या काही आठवड्यांपासून बडोद्यात होता आणि त्याने शहरातील रिलायन्स स्टेडियममध्ये कसून सराव केला. पण, तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधी पुनरागमन करेल याचे कोणतेही संकेत नाहीत. किशन बडोदा येथील किरण मोरे अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत आहे. गुजरात शहरातील क्रिकेटपटूंसाठी एक लोकप्रिय ठिकाण असलेल्या या अकादतमी त्याला हार्दिक व कृणाल या पांड्या बंधूंची साथ मिळाली आहे.  हार्दिक पांड्या हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे आणि इशान किशनही याच संघाचा सदस्य आहे.

किरण मोरेने यांनी क्रिकबजच्या या वृत्ताला दुजोरा दिला आहे.  किशनने गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून एकही सामना खेळलेला नाही आणि डिसेंबरच्या मध्यात दक्षिण आफ्रिकेतील संघाच्या सेटअपमधून बाहेर पडल्यानंतर तो गायबच होता.  शेवटच्या तीन कसोटींसाठी भारतीय संघनिवड पुढील दोन दिवसांत अपेक्षित आहे आणि विराट कोहली संघाचा भाग असणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.  दुसऱ्या कसोटीनंतर द्रविड यांनी त्याला शेवटची वॉर्निंग दिली होते. द्रविड म्हणाले होते की, भारतीय संघात त्याची निवड व्हावी असे त्याला वाटत असेल, तर त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात करायला हवी. आम्ही त्याच्या संपर्कात आहोत.

टॅग्स :इशान किशनहार्दिक पांड्याबीसीसीआयभारत विरुद्ध इंग्लंड