Ishan Kishan vs Jitesh Sharma ( Marathi News ) : भारतीय क्रिकेटमध्ये सध्या बराच गोंधळ सुरू आहे... विराट कोहली वैयक्तिक कारणास्तव संघाबाहेर आहे आणि कधी पुन्हा संघात परतेय, याबाबत त्याने बीसीसीआयलाही कळवलेले नाही. त्यात इशान किशन हे प्रकरण दिवसेंदिवस किचकट होत चालले आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर मानसिक थकवा असल्याचे सांगून त्याने विश्रांती मागितली आणि तोही कालपर्यंत नॉट रिचेबल होता. तो किरण मोरे यांच्या बडोदा येथील अकादमीत सराव करत असल्याचे वृत्त काल समोर आले. पण, आता एक नवीन ट्विस्ट आला आहे.
आफ्रिका दौऱ्यासाठी ट्वेंटी-२० संघात जितेश शर्माची निवड करून निवड समितीने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता आणि याच निर्णयावर इशान किशन नाराज असल्याचे वृत्त समोर येत आहे. जितेशच्या ट्वेंटी-२० संघात येण्याने इशानला असुरक्षित वाटू लागले होते. त्यामुळेच त्याने मानसिक थकवा सांगून विश्रांती घेतली होती.
किशनने गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून एकही सामना खेळलेला नाही आणि डिसेंबरच्या मध्यात दक्षिण आफ्रिकेतील संघाच्या सेटअपमधून बाहेर पडल्यानंतर तो गायबच होता. शेवटच्या तीन कसोटींसाठी भारतीय संघनिवड आज अपेक्षित आहे. दुसऱ्या कसोटीनंतर द्रविड यांनी त्याला शेवटची वॉर्निंग दिली होते. द्रविड म्हणाले होते की, भारतीय संघात त्याची निवड व्हावी असे त्याला वाटत असेल, तर त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात करायला हवी. आम्ही त्याच्या संपर्कात आहोत.
इशान किशनचं वागणं द्रविडला आवडलेलं नाही?
“सर्वांना संघात परतण्याची समान संधी आहे. मला फक्त इशान किशन बद्दल बोलायचे नाही. मी शक्य तितक्या चांगल्या प्रकारे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मुद्दा तुम्हाला माहीत आहे, त्याने ब्रेकची विनंती केली. आम्ही त्याला ब्रेक दिला. त्याने देशांतर्गत क्रिकेट खेळावे लागेल असे मी म्हटले नाही. मी म्हणालो, जेव्हा तो तयार असेल तेव्हा त्याला क्रिकेट खेळून परत यावे लागेल. आम्ही त्याला काहीही करण्यास भाग पाडत नाही आणि आम्ही त्याच्या संपर्कात आहोत,''
Web Title: Ishan Kishan unhappy with team management considering Jitesh Sharma for T20Is, Says Reports
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.