मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सला पराभूत करून सहाव्या ट्रॉफीच्या आशा कायम ठेवल्या आहेत. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिकवेळा किताब पटकावणारा संघ म्हणून मुंबईची ओळख आहे. यंदा चढ-उताराचा सामना करत मुंबईने प्लेऑफमध्ये धडक मारली. लखनौ सुपर जायंट्सचा दारूण पराभव करून मुंबई इंडियन्सने फायनलच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी रोहितसेनेसमोर गतविजेत्या गुजरात टायटन्सचे आव्हान असणार आहे. शुक्रवारी मुंबई आणि गुजरात यांच्यात सामना होणार असून यातील विजयी संघ फायनलमध्ये प्रवेश करेल.
काल झालेल्या सामन्यात मुंबईने ऐतिहासिक विजय मिळवत लखनौला बाहेरचा रस्ता दाखवला. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच मुंबई इंडियन्सने लखनौला पराभूत केले. ८१ धावांनी मोठा विजय मिळवून मुंबईने फायनलकडे कूच केली आहे. चेपॉकवर झालेल्या या लढतीचा आनंद घेण्यासाठी मुंबईच्या संघातील खेळाडूंच्या कुटुंबीयांनी देखील हजेरी लावली होती. लक्षणीय बाब म्हणजे इशान किशनची गर्लफ्रेंड अदिती हुंडियाने सर्वांचे लक्ष वेधले. अदितीसह रोहित शर्माची पत्नी रितीका सजदेह आणि सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा शेट्टी आपल्या संघाला चीअर करताना दिसली.
इशान किशनच्या गर्लफ्रेंडचे फोटो व्हायरल
"पडलो पण हरलो नाही...", मुंबईविरूद्धच्या पराभवानंतर गौतम गंभीरने चाहत्यांचे मानले आभार
दरम्यान, कालच्या 'करा किंवा मरा'च्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना मुंबईने शानदार कामगिरी केली. सांघिक खेळीच्या जोरावर संघाने निर्धारित २० षटकांत ८ गडी गमावून १८२ धावा केल्या. १८३ धावांच्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनौच्या फलंदाजांना घाम फुटला. मुंबईचा आकाश मधवाल लखनौच्या नवाबांसाठी काळ ठरला. त्याने ३.३ षटकांत केवळ ५ धावा देऊन ५ बळी घेतले. लखनौचा संघ २० षटकं देखील खेळू शकला नाही अन् १६.३ षटकांतच १०१ धावांवर सर्वबाद झाला.
मुंबईच्या 'आकाश'समोर लखनौचा किल्ला ढासळला
फलंदाजीसाठी कठीण वाटत असलेल्या खेळपट्टीवर मुंबईच्या फलंदाजांनी साजेशी खेळी केली. कॅमेरून ग्रीनने २३ चेंडूत ४१ धावांची सर्वाधिक खेळी केली, तर सूर्यकुमार यादवने (३३) धावा करून सन्मानजनक लक्ष्य उभारण्यात हातभार लावला. १८३ धावांचा बचाव करताना मुंबईने चमकदार कामगिरी केली. युवा आकाश मधवालने सर्वाधिक ५ बळी घेतले, तर ख्रिस जॉर्डन आणि पियुष चावला यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले.
Web Title: Ishan Kishan's girlfriend, Aditi Hundia, Rohit Sharma's wife Ritika Sajdeh and Suryakumar Yadav's wife Devisha Shetty attended to cheer the Mumbai Indians during the LSG vs MI match in IPL 2023
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.