नवी दिल्ली : ईशांत शर्माने आगामी दक्षिण आफ्रिका दौ-यात भारतीय आक्रमणाचे नेतृत्व करायला हवे. कारण त्याने अद्याप प्रतिभेला साजेशी कामगिरी केलेली नाही, असे मत भारताचा माजी वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसादने व्यक्त केले. भारताने ५ जानेवारीपासून केपटाऊनमध्ये प्रारंभ होत असलेल्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ईशांत, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह या पाच वेगवान गोलंदाजांची निवड केली आहे. या सर्वांमध्ये ईशांत सर्वात अनुभवी आहे, पण अंतिम ११ खेळाडूंमध्ये त्याचे स्थान पक्के नाही.१० वर्षांपूर्वी कसोटी पदार्पण करणा-या ईशांतने ७९ कसोटी सामने खेळताना २२६ बळी घेतले आहेत. प्रसाद म्हणाला, ‘ईशांत एका दशकापासून खेळत असून आतापर्यंत त्याने आक्रमणाचे नेतृत्व सांभाळायला हवे होते. त्याच्याकडे उंची, वेग आणि आक्रमकता आहे, पण त्याला आपल्या प्रतिभेला अद्याप न्याय देता आलेला नाही. जवागल श्रीनाथ, झहीर खान किंवा कपिल देव यांनी आपल्या कार्यकाळात जी भूमिका बजावली, ती भूमिका त्याने बजावायला पाहिजे.’दक्षिण आफ्रिका दौ-यासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय वेगवान गोलंदाजांबाबत विचारले असता प्रसाद म्हणाला की, त्यांच्यात विविधतेची वानवा नाही, पण परिस्थितीसोबत ते कसे जुळवून घेतात हे बघावे लागेल. वन-डे व टी-२०मध्ये सातत्याने चांगली कामगिरी करीत असलेल्या बुमराहची प्रथमच कसोटी संघात निवड झाली आहे. प्रसाद म्हणाला, ‘त्याने चांगली कामगिरी केली आहे म्हणूनच त्याची निवड झाली आहे.’त्याची कामगिरी कशी होते, याची उत्सुकता आहे. कसोटी क्रिकेट व मर्यादित षटकांचे क्रिकेट यामध्ये गोलंदाजी करण्यात फरक असतो.’दक्षिण आफ्रिका संघात डेल स्टेन, मोर्नी मोर्कल, वेर्नोन फिलँडर आणि कागिसो रबाडा यांच्यासारखे गोलंदाज आहेत. प्रसादच्या मते, दुखापतीनंतर पुनरागमन करीत असलेला डेल स्टेन आणि मोर्कल भारतासाठी धोकादायक नाहीत, पण रबाडापासून सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. रबाडा युवा असून त्याच्याकडे वेग आहे. त्यामुळे फलंदाजांना असमतोल उसळणाºया चेंडूंना सामोरे जाताना अडचण जाते, असेही प्रसाद म्हणाला.>सर्व गोलंदाज एकमेकांपासून वेगळे आहेत. आता अधिक क्रिकेट होत असल्यामुळे १०-१५ वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेत जशा खेळपट्ट्या होत्या तशा खेळपट्ट्या आता राहिलेल्या नाहीत. अतिरिक्त उसळीचा वेगवान गोलंदाजांना लाभ मिळेल; पण भारतीय गोलंदाज या परिस्थितीचा कसा लाभ घेतात, हे बघावे लागेल. -वेंकटेश प्रसाद
- Cricket Buzz»
- बातम्या»
- ईशांतला चांगली कामगिरी करावी लागेल
ईशांतला चांगली कामगिरी करावी लागेल
नवी दिल्ली : ईशांत शर्माने आगामी दक्षिण आफ्रिका दौ-यात भारतीय आक्रमणाचे नेतृत्व करायला हवे. कारण त्याने अद्याप प्रतिभेला साजेशी कामगिरी केलेली नाही, असे मत भारताचा माजी वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसादने व्यक्त केले.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 11:59 PM