नवी दिल्ली : ईशांत शर्मा याने २०१९ मध्ये एका रणजी चषक सामन्याच्यादरम्यान मुलाखतीसाठी बोलवले गेले तेव्हा त्याने नकार दिला होता. आणि स्वत:चे वर्णन ‘विझलेला निखारा’ असे केले होते. मात्र आता हाच ईशांत भारताकडून आपला १०० वा कसोटी सामना खेळण्याच्या तयारीत आहे. कपिल देव यांच्यानंतर तो १०० कसोटी खेळणारा तो दुसरा जलदगती गोलंदाज ठरेल.
मागील १६ वर्षांपासून ईशांतचा सहकारी असलेल्या प्रदीप संगवान याच्या मते जेव्हा ईशांत शर्मा याने दिल्लीच्या १७ वर्षाआतील संघाच्या निवड चाचणीत सहभाग नोंदवला होता. तेव्हा तो वेगळा गोलंदाज होता. त्याचे केसदेखील खूप लांब होते. आम्ही त्याला केसांवरून चिडवत होतो. विराटच्या नेतृत्वात जेव्हा आम्ही २००८ मध्ये १९ वर्षाआतील विश्वचषक जिंकला तेव्हा ईशांत हा कसोटीपटू बनला होता. त्याला त्या स्पर्धेत खेळण्याची गरज पडली नाही. त्याने पहिल्या ७९ कसोटीत २२६ बळी घेतले होते. तर गेल्या २० सामन्यात त्याने ७६ बळी घेतले आहेत. त्यावरून लक्षात येते की त्याने संघाच्या अनुसारच खेळ केला आहे.
दहिया याने सांगितले की, धोनीने त्याचा उपयोग बचावात्मक गोलंदाज म्हणून केला. यासाठी तो ईशांतवर विश्वास ठेवत होता. तो संघात इतका काळ का टिकला, याचे कारण आहे की, त्याच्या कर्णधाराला नेमके काय हवे आहे हे त्याला माहीत आहे.
ईशांत याचे माजी सहकारी आणि प्रशिक्षक विजय दहिया यांच्या मते देशाकडून १०० कसोटी सामने खेळणारा तो अखेरचा जलदगती गोलंदाज ठरेल. दहिया यांनी सांगितले की, मला वाटत नाही की, ईशांतनंतर दुसरा कोणताही जलदगती गोलंदाज देशाकडून १०० कसोटी सामने खेळू शकेल. कारण हे सर्व खेळाडू आता स्वत:ला आयपीएलच्या दृष्टीने फिट ठेवतात.’