जॉर्ज फ्लॉयड याच्या मृत्यूनंतर अमेरिकेसह जगभरात संतापाची लाट पसरली आहे. कृष्णवर्णीयांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात अनेक दिग्गज उभे राहिले आहेत. त्यात वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमी यानेही इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( आयपीएल) वर्णद्वेष होत असल्याचा आरोप केला. त्याच्यासह श्रीलंकेचा थिसारा परेरा यांच्यावर सनरायझर्स हैदराबाद संघाचे खेळाडू वर्णद्वेषी टिप्पणी करत असल्याचे दावा सॅमीनं केला. त्यानंतर एकच खळबळ माजली. सॅमीच्या या दाव्यानंतर इशांत शर्माची सहा वर्षांपूर्वीची पोस्ट व्हायरल होऊ लागली आहे. त्यामुळे भारताचा गोलंदाज अडचणीत सापडणार असल्याची चिन्ह दिसत आहेत.
इशांत शर्माची जूनी पोस्ट व्हायरल होत आहे. 2014 मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाचा सदस्य असताना इशांतने एक फोटो शेअर केला होता. त्यात इशांतसह भुवनेश्वर कुमार, डॅरेन सॅमी आणि डेल स्टेन हे आहेत. पण, इशांतनं या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये सॅमीचा उल्लेक 'कल्लू' म्हणून केला होता. त्यामुळे तो फोटो आता व्हायरल होत आहे.
या शब्दाचा अर्थ त्याला माहीत नव्हता आणि आता त्यानं त्या खेळाडूंना मॅसेज करायला सुरूवात केली आहे, जे त्याला कल्लू म्हणून बोलवायचे. तो म्हणाला,''मी जगभरात अनेक लीगमध्ये खेळलो आणि मला लोकांनी भरभरून प्रेम दिलं. अनेक खेळाडूंसोबत ड्रेसिंग रुम शेअर केला आहे. पण, जेव्हा मला त्या शब्दाचा अर्थ समजला, तेव्हा मला राग अनावर झाला. सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळताना मला त्या शब्दानं खेळाडू बोलवत होते. त्या शब्दानं कृष्णवर्णीयांचा अन्याय होतो, हे मला आता समजले.''
त्या नावानं सतत बोलावलं जायचं आणि सहकारी हसायचे, असेही तो म्हणाला.''मला त्या नावानं हाक मारणाऱ्या प्रत्येकाला मी मॅसेज केला आहे. तुम्ही मला त्या नावानं बोलवायचा, तेव्हा त्याचा अर्थ हा घट्ट नातं असं असेल मला वाटायचे. मला त्याचा अर्थ माहीत नव्हता. तुम्ही माझा अपमान करत होता. मी तुम्हाला मॅसेज केला आहे. मला तुम्ही नक्की कोणत्या हेतूनं त्या नावानं बोलवायचा? त्यामुळे मला उत्तर द्या. जर तुम्ही अनादर करत असाल, तर मला खूप वाईट वाटेल.''
Most Expensive: पत्नीला घटस्फोट देणं खेळाडूंना पडलं 'महागात'; पोटगीची किंमत ऐकून चक्रावेल डोकं!
OMG : इटालियन फुटबॉल फॅन्सच्या चाहत्या अँकरच्या घरी चोरी; 1.27 कोटींच्या वस्तू लंपास!
वेस्ट इंडिजच्या खेळाडूंचा कोरोना अहवाल निगेटिव्ह; इंग्लंड दौऱ्यासाठी ग्रीन सिग्नल!
Broom Broom... महेंद्रसिंग धोनीचं Bike कलेक्शन अन् त्यासाठी उभारलाय अलिशान बंगला!
मन विषण्ण करणारी घटना; पाण्याच्या टाकीत 13 माकडं मृतावस्थेत, विषप्रयोगाचा संशय