Israeli airstrikes on Hamas: गाझा पट्टीच्या शहरातून गेल्या तीन दिवसांत 1500 हून अधिक रॉकेटचा मारा करणाऱ्या जहाल गट हमासविरोधात इस्त्रायलने (Israel attack) जोरदार वार केला आहे. प्रत्यूत्तरादाखल केलेल्या कारवाईत हमासला (Hamas) मोठा झटका बसला आहे. त्याचे 11 कमांडर मारले गेले आहेत. या रक्तरंजित संघर्षात पॅलेस्टाइनचे 70 लोक मारले गेल्याचे समजते आहे. त्यात 13 लहान मुलांचाही समावेश आहे. अनेक क्रिकेटपटूंनी या हल्ल्याचा निषेध करताना श्रंद्धांजली वाहिली आणि त्यात भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणसह ( Irfan Pathan) पाकिस्तानच्या खेळाडूंचा समावेश आहे.
यापूर्वीही 2014मध्ये #FreePalestine movement सहभाग घेताना मोईन अलीनं भारताविरुद्धच्या कसोटीत हातावार “Free Palestine'' लिहिलेली पट्टी बांधली होती. गाझाच्या आरोग्य मंत्रालयानुसार इस्त्रायलच्या हल्ल्यात मृतांची संख्या 70 झाली आहे. यामध्ये 16 मुले सहभागी आहेत. तर 300 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. हमासने आतापर्यंत 1500 हून अधिक रॉकेट डागले आहेत. यामध्ये एक इस्त्रायलचा सैनिक ठार झाला आहे.