नवी दिल्ली : आयपीएल लिलावासाठी बेंगळुरू, नवी दिल्ली, मुंबई आणि हैदराबादसह तुर्कस्थानची राजधानी इस्तंबूल शहराचादेखील विचार करण्यात येत आहे. अंतिम निर्णय मात्र आयपीएल संचालन परिषदेच्या बैठकीत होईल, असे बीसीसीआय सूत्रांनी सांगितले.
बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार नवे अध्यक्ष अरुण धुमल यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक होणार आहे. त्यातअंतिम निर्णय होईल.
मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा लहान लिलाव होईल. त्यासाठी सर्व दहा फ्रेंन्चायजींना १५ नोव्हेंबरपर्यंत आपल्यासोबत कायम ठेवणाऱ्या खेळाडूंची यादी देण्यास सांगण्यात आले आहे. शिवाय पुढील सत्रासाठी वेतनाची रक्कम ९० वरून १५ कोटी करण्यात येणार आहे.