Join us  

खळबळजनक दावा! India vs Pakistan फायनल होण्यासाठी आशिया चषकाचा ड्रॉ फिक्स केला गेला होता

Asia Cup 2023, IND vs PAK : आशिया चषक २०२३ स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे असले तरी भारतासोबतच्या संबंधांमुळे त्यांना ९ सामने श्रीलंकेत खेळवावे लागले.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 4:21 PM

Open in App

Asia Cup 2023, IND vs PAK : आशिया चषक २०२३ स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे असले तरी भारतासोबतच्या संबंधांमुळे त्यांना ९ सामने श्रीलंकेत खेळवावे लागले. मात्र, श्रीलंकेत आशिया चषक खेळवण्याचा निर्णय चुकीचा ठरतोय. पावसामुळे आशिया चषक स्पर्धेतील बऱ्याच लढतींमध्ये अडथळा निर्माण केला. आजही श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातल्या लढतीत पावसाची जोरदार एन्ट्री झाली आहे आणि एक तास उलटूनही मैदानावरील कव्हर्स जसेच्या तसेच आहेत. आजची लढत जो जिंकेल तो संघ भारताविरुद्ध १७ सप्टेंबरला फायनल खेळेल, परंतु पावसामुळे सामना रद्द झाला तर सरस नेट रन रेटच्या जोरावर श्रीलंका फायनलमध्ये प्रवेश करेल. पण, आशिया चषक स्पर्धेचा ड्रॉ हा India vs Pakistan फायनल व्हावा यादृष्टीने आखल्याचा दावा श्रीलंकेचा माजी खेळाडू चरिथ सेनानायके याने केला आहे.

बाबरशिवाय तुमच्याकडे आहेच कोण? सुनील गावस्करांकडून पाकिस्तानची बोलती बंदभारत-पाकिस्तान यांच्यातल्या सुपर ४ लढतीसाठी राखीव दिवस ठेवला गेला, परंतु श्रीलंकेच्या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला गेलेला नाही. फायनलसाठीही राखीव दिवस नसल्याने पावसामुळे रविवारी सामना न झाल्यास दोन्ही संघांना संयुक्त जेतेपद दिले जाईल. हाच मुद्दा पकडून सेनानायक याने खळबळजनक दावा केला आहे. त्याने आशिया चषक स्पर्धेचा ड्रॉ फिक्सड् असल्याचा दावा केला आहे. 

न्यू इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सेनानायके म्हणाला, स्पर्धेपूर्वीच येथील वातावरण कसे असेल याची माहिती आयोजकांना होती आणि त्याची कल्पना सर्व संघांनाही होती. त्यामुळे जोपर्यंत सर्व संघांची सहमती नसेल, तर नियम बदलता येत नाही. अन्यथा त्याला रडीचा डाव म्हणावं लागेल. अशा परिस्थितीत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला राखीव दिवस हवा होता, तर स्पर्धेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो. त्यावर प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रत्येकाला भारत-पाकिस्तान फायनल हवी आहे आणि त्यासाठी ड्रॉ तयार केला गेला आहे. तुम्ही एका क्रिकेट बोर्डासाठी एक न्याय अन् इतरांसाठी दुसरा, असं करू शकत नाही.'' 

टॅग्स :एशिया कप 2023भारत विरुद्ध पाकिस्तानश्रीलंका