बीसीसीआयने बुधावरी श्रीलंकेविरुद्धच्या टी-ट्वेंटी आणि वन-डे सीरीजसाठी टीम जाहीर केली. टी-ट्वेंटी सीरीजसाठी संघ जाहीर करताना, बीसीसीआयचे धाडसी निर्णय दिसून आलेत. प्रमुख खेळाडूंना टीम इंडियात स्थान मिळालेलं नाही. टी-ट्वेंटीमध्ये नवीन दृष्टीकोनातून संघ बांधणी करण्यासाठी युवा खेळाडूंना संधी दिलीय. टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पराभव झाल्यानंतर टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये अमूलाग्र बदल करण्याचे संकेत बीसीसीआयने दिले होते. त्यानूसार बदलही दिसून आले.
श्रीलंकेविरुद्धच्या टी-ट्वेंटी सीरीजसाठी रोहित शर्मा, विरोट कोहली, केएल राहुल आणि ऋषभ पंतला विश्रांती देत हार्दिक पांड्याला टी-ट्वेंटी संघाचे कर्णधार पद दिले आहे. तर सुर्यकुमार यादवला उपकर्णधार पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. टी-ट्वेंटी संघात बदल केल्यानंतर आता भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा पर्याय देखील बीसीसीआय शोधत असल्याची माहिती समोर आली आहे.
वन-डे आणि टेस्ट क्रिकेटसाठी राहुल द्रविड प्रशिक्षक म्हणून कायम राहू शकतात. मात्र टी-ट्वेंटी क्रिकेटसाठी परदेशी प्रशिक्षकाची निवड केली जाऊ शकते. तसेच असं झाल्यास ७ वर्षांनी भारतीय संघाचा परदेशी प्रशिक्षक मिळणार आहे.बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की, आमच्या तत्त्वांनुसार चालणारा परदेशी प्रशिक्षक आढळल्यास त्याला नक्कीच संधी दिली जाईल. फक्त कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडकडे बघा. ब्रेंडन मॅक्युलमने कसोटी क्रिकेटचा चेहरामोहराच बदलून टाकला आहे. त्यामुळे नक्की आम्ही नक्की विचार करु, मात्र सध्यातरी भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविडचं आहेत.
शिवम मावी, मुकेश कुमारला संधी
टी२० विश्वचषकानंतर अनेक गोष्टींची चर्चा रंगली होती. त्यानुसार बोर्ड आता युवा खेळाडूंना संधी देताना दिसतोय. तेच या संघातही पाहायला मिळाले आहे. शुभमन गिल, राहुल त्रिपाठी यांना संघात स्थान दिले आहे. त्याच्याशिवाय युवा वेगवान गोलंदाज शिवम मावीलाही संधी मिळाली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या वन डे मालिकेत संघात निवड झालेल्या मुकेश कुमारलाही टी२० मालिकेतही संधी मिळाली.
भारताचा टी२० संघ- हार्दिक पांड्या (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार
भारताचा वन डे संघ- रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, उमरान मलिक, अर्शदीप सिंग.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: It has been reported that the BCCI is also looking for a replacement for Indian team coach Rahul Dravid.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.