तिरुवनंतपुरम : भारतीय कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या टी२० लढतीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर संघाच्या सुमार क्षेत्ररक्षणावर टीका केली. ‘जर अशी स्थिती असेल तर कुठल्याही लक्ष्याचा बचाव करणे कठीण आहे. क्षेत्ररक्षण करताना खेळाडूंनी अधिक दक्ष असायला हवे,’ असे विराट म्हणाला.
रविवारी विंडीजविरुद्ध वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या षटकात सलग दोन चेंडूंवर वाशिंग्टन सुंदर व यष्टिरक्षक रिषभ पंत यांनी सलामीवीर फलंदाज लेंडल सिमन्स व निकोलस पूरन यांचे झेल सोडले. सिमन्सने ४५ चेंडूंमध्ये नाबाद ६७ धावा केल्या, तर निकोलस पूरनने १८ चेंडूंमध्ये ३८ धावांची आक्रमक नाबाद खेळी केली. यांच्या कामगिरीच्या जोरावर वेस्ट इंडिजने या लढतीत ८ गडी राखून विजय मिळवला. सामन्यानंतर कोहली म्हणाला, ‘जर आमचे क्षेत्ररक्षण एवढे सुमार राहिले, तर कुठलेही लक्ष्य पुरेसे ठरणार नाही. गेल्या दोन सामन्यात आमचे क्षेत्ररक्षण सुमार दर्जाचे होते. आम्ही एका षटकात दोन झेल सोडले. जर आम्ही ते दोन बळी घेतले असते तर त्यांच्यावर दडपण वाढले असते.’ विराट पुढे म्हणाला,‘आम्हाला कुठल्याही मैदानावर दक्ष असणे आवश्यक आहे.’
भारताने प्रथम फलंदाजी करताना गेल्या १५ टी२० सामन्यांपैकी सात सामने गमावले. कोहलीला या आकडेवारीबाबत छेडले असता तो म्हणाला,‘आकडे बरेच काही सांगून जातात. आम्ही प्रथम फलंदाजी करताना सुरुवातीच्या १६ षटकांत ४ बाद १४० अशा चांगल्या स्थितीत होतो, पण अखेरच्या चार षटकांत आम्हाला अपेक्षित धावगती वाढविता आली नाही. त्यात आम्ही ४०-४५ धावा वसूल करायला हव्या होत्या, पण आम्हाला केवळ ३० धावा करता आल्या.’
भारतीय कर्णधारने ३० चेंडूंमध्ये ५४ धावांची खेळी करणारा युवा फलंदाज शिवम दुबेची प्रशंसा केली. कोहली म्हणाला,‘आम्ही दुबेला तिसºया क्रमांकावर पाठविण्याचा निर्णय घेतला आणि तो यशस्वीही ठरला.
‘मला वरिष्ठ खेळाडूकडून अशाच प्रेरणेची गरज होती. त्यानंतर मी षटकार ठोकला आणि नैसर्गिक खेळ केला,’ असे शिवम म्हणाला. क्षेत्ररक्षणाविषयी तो म्हणाला, ‘आमचे क्षेत्ररक्षण सुमार झाले, पण कुठल्याही संघाकडून झेल सुटू शकतात. आमचा संघ सर्वोत्तम आहे. आम्ही दमदार पुनरागमन करू.’
विंडीजचा कर्णधार किरोन पोलार्ड भारताला १७० धावांत रोखल्याने समाधानी होता. तो म्हणाला,‘भारताला १७० धावांत रोखणे शानदार होते. आम्ही लक्ष्याचा पाठलाग करताना योजना आखलेली आणि खेळाडूंनी चांगल्या पद्धतीने पाठलाग केला.’लेग स्पिनर हेडन वॉल्शची प्रशंसा करताना पोलार्ड म्हणाला,‘संघात सीपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाºया काही खेळाडूंचा समावेश आहे. वॉल्शची चार षटके शानदार होती.’
‘शिवममुळे आम्हाला १७० पर्यंत मजल मारता आली. प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास वेस्ट इंडिजने चांगली गोलंदाजी केली. त्यांनी या खेळपट्टीचे आकलन चांगल्या पद्धतीने केले. ते चांगले खेळले आणि विजयाचे हकदार होते’, असे विराट म्हणाला.कुठल्याही मैदानावर षटकार ठोकण्यास सक्षम - शिवम दुबे
शिवम दुबेला जगातील कुठल्याही मैदानावर षटकार ठोकण्यास सक्षम असल्याचा विश्वास आहे. रविवारी तिसºया क्रमांवर फलंदाजीची संधी मिळालेल्या दुबेने ३० चेंडूंमध्ये चार षटकारांच्या मदतीने ५४ धावा केल्या. सामन्यानंतर दुबे म्हणाला,‘हे मैदान मोठे होते, पण मी कुठल्याही मैदानावर षटकार ठोकू शकतो.’ ज्यावेळी दुबे टायमिंग साधण्यासाठी संघर्ष करीत होता त्यावेळी उपकर्णधार रोहित शर्माने त्याला संयम राखून खेळण्याचा सल्ला दिला. दुबे म्हणाला,‘तिसºया क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळणे माझ्यासाठी मोठी बाब आहे. माझ्यावर निश्चितच दडपण होते. त्यानंतर रोहित शर्माने माझी मदत केली. संयम राखून आपल्या कौशल्याचा वापर करण्याचा त्याने सल्ला दिला.