"काय मस्करी लावलीय, पाकिस्तान भारताशी खेळला नाही तरीही..."; IND vs PAK वरून जावेद मियाँदाद यांचा तीळपापड

Javed Miandad, Champions Trophy 2025 India vs Pakistan: आगामी चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धा पाकिस्तानात होणार असून भारताने तिथे जायला नकार कळवला आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 09:48 AM2024-11-11T09:48:40+5:302024-11-11T09:52:32+5:30

whatsapp join usJoin us
It is a joke angry Javed Miandad reacts after India refusal to travel to Pakistan for the Champions Trophy 2025 IND vs PAK | "काय मस्करी लावलीय, पाकिस्तान भारताशी खेळला नाही तरीही..."; IND vs PAK वरून जावेद मियाँदाद यांचा तीळपापड

"काय मस्करी लावलीय, पाकिस्तान भारताशी खेळला नाही तरीही..."; IND vs PAK वरून जावेद मियाँदाद यांचा तीळपापड

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Javed Miandad, India vs Pakistan: पाकिस्तानात पुढील वर्षाच्या सुरुवातीला Champions Trophy 2025 होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ पाकिस्तानला ( Ind vs Pak ) जाणार की नाही याबाबत संभ्रम होता. पाकिस्तानी माजी खेळाडू भारताला इशारे देत दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होते. पाक क्रिकेट बोर्डाने भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली होती. एवढे करूनही आज बीसीआयने भारतीय संघ ( Team India ) पाकिस्तानला जाणार नाही असे आयसीसीला कळवून टाकले आहे. या निर्णयानंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियाँदादचा तीळपापड झाला आहे. त्याने अतिशय संतप्त प्रतिक्रिया दिली.

ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार, BCCI ने ICC ला याची माहिती दिली आहे. भारत सरकारने बीसीसीआयला आपली टीम पाकिस्तानात न पाठविण्याचा सल्ला दिल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे. चॅम्पिअन्स ट्रॉफीमध्ये ८ संघ सहभागी होणार आहेत. याचे यजमानपद पाकिस्तानला मिळाले होते. परंतू, भारताशिवाय या स्पर्धेला काहीच महत्व नाही हे पाकिस्तान आणि आयसीसीलाही माहिती होते. यामुळे अखेरच्या क्षणापर्यंत भारतावर दबाव टाकण्याचे काम पाकिस्तान करत होते. पाकिस्तानमध्ये श्रीलंकेच्या टीमवर दहशतवादी हल्ला झाला होता, ही बाब अद्याप क्रिकेटविश्व विसरू शकलेले नाही.

जावेद मियाँदाद म्हणाले...

"ही काय मस्करी लावलीय... जरी पाकिस्तान भारताविरूद्ध क्रिकेट खेळलं नाही तरीही पाकिस्तान क्रिकेटला काहीही नुकसान होणार नाही. उलट आमचे क्रिकेट आणि देश आधीसारखाच अधिकाधिक समृद्ध होईल. मला तर आता ही गोष्टी पाहायचीय की ICC स्पर्धा भारत आणि पाकिस्तान एकत्र न खेळल्यावर पैसे कुठून मिळवणार. भारताने क्रिकेटसाठी पाकिस्तानात न येणं ही क्रिकेटसाठी वाईट गोष्ट आहे. खरं पाहता पाकिस्तानात भारतीय संघाला कसलाही धोका नाही. त्यांना येथे सर्वोच्च प्रतीचे आदरातिथ्य मिळेल. भारताने आपला संघ पाकिस्तानात न पाठवण्यासाठी कोणतेही ठोस कारण न देणे ही बाब अयोग्य आहे. या स्पर्धेची तयारी खूप आधीपासून झालेली आहे. भारतासह सर्व संघांच्या सुरक्षेची हमी आम्ही आधीच ICCला दिली आहे. पण तरीही असं घडणे योग्य नाही," असे जावेद मियाँदाद म्हणाला.

Web Title: It is a joke angry Javed Miandad reacts after India refusal to travel to Pakistan for the Champions Trophy 2025 IND vs PAK

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.