Join us  

YO-YO Test मध्ये पास न होणाऱ्यांना संघातून वगळणं चुकीचंच; गंभीरचं रोखठोक मत

गौतम गंभीर टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2024 7:01 AM

Open in App

Gautam Gambhir On YO YO Test : भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीर टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. यासाठी बीसीसीआयने अर्ज देखील मागवले होते. विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ नंतर कार्यकाळ संपणार आहे. सध्या ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार सुरू असताना गंभीरने खेळाडूंच्या यो-यो टेस्टवर प्रश्न उपस्थित केले आहेत. भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी केवळ फिटनेस महत्त्वाचा नकोय असे गंभीरने स्पष्ट केले.

गौतम गंभीर म्हणाला की, फिटनेस असायलाच हवा यात शंका नाही, पण आपण फिट आहे हे दाखवून देण्यासाठी फिटनेस टेस्ट पास करायला हवी असे म्हणता येणार नाही. फिटनेस थेट ट्रेनरशी संबंधित असावा. जर एखाद्या ट्रेनरला वाटत असेल की तुम्ही पुरेसे फिट आहात. काही लोक शारीरिकदृष्ट्या इतके मजबूत असतात की ते जिममध्ये खूप वजन उचलू शकतात. 

गंभीरचे रोखठोक मत

तसेच जर यो-यो चाचणीमुळे एखाद्या खेळाडूची संघात निवड होत नसेल, तर मला ही पद्धत योग्य वाटत नाही. तुम्ही खेळाडूंची निवड त्यांच्यातील प्रतिभा, त्यांचे फलंदाजी कौशल्य, गोलंदाजी कौशल्याच्या आधारे करता. मग त्यांच्या फिटनेसवर काम करत राहणे आणि त्यांना शारीरिकरित्या सुधारणे हे ट्रेनरचे काम आहे कारण कोणीतरी यो-यो चाचणी पास होत नाही, हे अन्यायकारक आहे, असेही गंभीरने म्हटले. तो 'स्पोर्ट्सकीडा'शी बोलत होता. 

गंभीरने अलीकडेच प्रशिक्षकाबद्दल म्हटले होते की, तुमच्या राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक होण्यापेक्षा मोठा सन्मान नाही. या पदावर असताना तुम्ही १४० कोटी भारतीयांचे आणि जगभरातील लोकांचेही प्रतिनिधित्व करत असता. जेव्हा तुम्ही भारताचे प्रतिनिधित्व करत असता... तेव्हा यापेक्षा मोठा सन्मान तो काय असू शकतो? पण मी भारताला विश्वचषक जिंकण्यासाठी कशी मदत करू शकतो? मला वाटते की भारताला विश्वचषक जिंकण्यास मदत करणारे १४० कोटी भारतीय आहेत. जर प्रत्येक भारतीय आमच्यासाठी प्रार्थना करू लागला आणि आम्ही त्यांचे प्रतिनिधित्व करू लागलो तर भारत विश्वचषक जिंकेल यात शंका नाही. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे निर्भय असणे गरजेचे आहे. जर तुम्ही मला विचाराल तर होय, मला भारतीय संघाचे प्रशिक्षक बनायला आवडेल. 

टॅग्स :गौतम गंभीरबीसीसीआयभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघ