सुनील गावस्कर -झटपट सामने खेळल्यानंतर भारत- न्यूझीलंड संघ आता कसोटीसारख्या दीर्घ प्रकारात आमनेसामने येणार आहेत. या दोन्ही संघांतील काही धडाकेबाज फलंदाज कसोटी क्रिकेटपटूंसाठी जागा मोकळी करतील. पुढील काही दिवसात कामगिरीसाठी सर्वांना तंदुरुस्तीची गरज भासेल. कसोटी सर्वाधिक आव्हानात्मक असते. येथे खेळाडूृचे तंत्र आणि कौशल्याची परीक्षा घेतली जाते. याशिवाय संयम किती हे कळते. दिवसभरातील खेळात चढउतार तीन सत्रांत पहायला मिळतात. एकाग्र चित्ताने खेळणे कसोटीत यशाचे गमक आहे. सामन्याचा निकाल ठरविण्यासाठी एकाग्रता निर्णायक भूमिका बजावते.मागच्या काही वर्षांत कानपूरची खेळपट्टी फलंदाजांसाठी स्वप्नवत असल्याचे आपण पाहिले. येथे चेंडू नवीन असो की जुना, तो सहजपणे बॅटवर येतो. चेंडूत हालचाल नसतेच. जो फलंदाज खेळपट्टीवर अधिक वेळ घालवतो तो सहजपणे खेळू शकतो. चेतेश्वर पुजारा आणि केन विलियम्सन हे पाचही दिवस फलंदाजी करू शकतात. अलीकडे मात्र मी ही खेळपट्टी पाहिलेली नाही. तरीही त्यात काही बदल झाला असावा, असे वाटत नाही. ग्रीन पार्कची खेळपट्टी नेहमीसारखीच असेल, असे मानण्यास हरकत नाही.
देशासाठी नकार?- खेळात ‘वर्कलोड’ नावाचा नवा शब्द आला. याचा अर्थ दोन्ही संघात नियमित खेळाडू पहायला मिळणार नाहीत. त्यामुळे मालिकेतून ‘टेस्ट’ शब्द वेगळा होताना जाणवत आहे. - आधुनिक क्रिकेटमध्ये हे शक्य असावे. माझ्या पिढीतील लोकांना मात्र आश्चर्य वाटते. - देशासाठी खेळण्यास तुम्ही कसे काय नकार देऊ शकता? तेदेखील कथित वर्कलोडमुळे? - वर्कलोडचा दुसरा अर्थ विचारात घेतल्यास दुसऱ्या खेळाडूकडे स्वत:ला सिद्ध करण्याची संधी असते. - हा खेळाडू देशासाठी खेळण्यास किती लायक आहे याचा वेध घेता येतो. या सामन्याद्वारे एक किवा दोन प्रतिभावान खेळाडू गवसतील. - भारताला भारतात पराभूत करणे कठीण असते. हे वास्तव दोन सामन्यांच्या मालिकेत बदलेल, असे वाटत नाही.