Ravi Shastri : ६ वर्ल्ड कप खेळल्यानंतर सचिन तेंडुलकरनं एक जिंकला, म्हणून...; रवी शास्त्री यांचे विराटच्या बचावात मोठे विधान 

Ravi Shastri Comes In Support Of Kohli भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री ( Ravi Shastri) हे पुन्हा एकदा विराट कोहली ( Virat Kohli) याच्या बचावासाठी मैदानावर उतरले.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 11:30 AM2022-01-25T11:30:04+5:302022-01-25T11:30:57+5:30

whatsapp join usJoin us
It took Tendulkar 6 World Cups before winning one, Ganguly, Dravid, Laxman haven't won World Cup, doesn't mean they are bad players, say Ravi Shastri | Ravi Shastri : ६ वर्ल्ड कप खेळल्यानंतर सचिन तेंडुलकरनं एक जिंकला, म्हणून...; रवी शास्त्री यांचे विराटच्या बचावात मोठे विधान 

Ravi Shastri : ६ वर्ल्ड कप खेळल्यानंतर सचिन तेंडुलकरनं एक जिंकला, म्हणून...; रवी शास्त्री यांचे विराटच्या बचावात मोठे विधान 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Ravi Shastri Comes In Support Of Kohli - भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री ( Ravi Shastri) हे पुन्हा एकदा विराट कोहली ( Virat Kohli) याच्या बचावासाठी मैदानावर उतरले. विराट कोहलीनं मागील पाच महिन्यांत ट्वेंटी-२०, वन डे आणि कसोटी संघाचे कर्णधारपद सोडून फक्त फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे. विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला एकही आयसीसी स्पर्धा जिंकता आलेली नाही, त्यामुळे त्यानं राजीनामा दिला नसता तर बीसीसीआयनं त्याची हकालपट्टी करण्याची तयारी केल्याचीही चर्चा रंगली. BCCIच्या पवित्र्यावरून रवी शास्त्री यांनी सडेतोड मत व्यक्त केले. वर्ल्ड कप जिंकता आला नाही, म्हणून एखाद्या खेळाडूला तुम्ही अपयशी नाही बोलू शकत, असे मत त्यांनी व्यक्त केले.  


ANI शी बोलताना ते म्हणाले, ''६ वर्ल्ड कप खेळल्यानंतर सचिन तेंडुलकरनं १ जेतेपद पटकावले. सौरव गांगुली, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी वर्ल्ड कप जिंकलेला नाही. याचा अर्थ ते खराब किंवा अपयशी खेळाडू आहेत, असा होत नाही. आपल्याकडे फक्त दोनच वर्ल्ड कप विजेते कर्णधार आहेत.त्यामुळे आयसीसी स्पर्धा जिंकण्यावरून कर्णधाराच्या कामगिरीचे मुल्यांकन होता कामा नये.'' Legends Cricket League साठी शास्त्री ओमान येथे आहेत आणि तेथे त्यांनी ANIला ही प्रतिक्रिया दिली.  

Virat Kohli आणखी 2 वर्ष कसोटी कर्णधारपदावर राहिला असता, परंतु अनेकांना त्याचे यश पचले नसते
 

India Todayला दिलेल्या मुलाखतीत शास्त्री म्हणाले,''विराट कोहलीनं कसोटी संघाच्या कर्णधारपदावर कायम राहायला हवे होते की नाही, तर हो. त्यानं आणखी दोन वर्ष तरी कसोटी संघाचे नेतृत्व संभाळले असते. पुढील दोन वर्षांत भारतीय संघ घरच्या मैदानावर खेळणार आहे आणि त्यांचा मुकाबला कसोटी क्रमवारीत 9-10 क्रमांकावर असलेल्या संघांसोबत आहे. त्यामुळे कर्णधार म्हणून त्याच्या नावावर 50-60 विजय नक्की नोंदवले गेले असते, परंतु हे अनेक लोकांना पचनी पडले नसते. त्यांची पोट दुखी सुरू झाली असती.'' 
 

Web Title: It took Tendulkar 6 World Cups before winning one, Ganguly, Dravid, Laxman haven't won World Cup, doesn't mean they are bad players, say Ravi Shastri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.