Ravi Shastri Comes In Support Of Kohli - भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री ( Ravi Shastri) हे पुन्हा एकदा विराट कोहली ( Virat Kohli) याच्या बचावासाठी मैदानावर उतरले. विराट कोहलीनं मागील पाच महिन्यांत ट्वेंटी-२०, वन डे आणि कसोटी संघाचे कर्णधारपद सोडून फक्त फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे. विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला एकही आयसीसी स्पर्धा जिंकता आलेली नाही, त्यामुळे त्यानं राजीनामा दिला नसता तर बीसीसीआयनं त्याची हकालपट्टी करण्याची तयारी केल्याचीही चर्चा रंगली. BCCIच्या पवित्र्यावरून रवी शास्त्री यांनी सडेतोड मत व्यक्त केले. वर्ल्ड कप जिंकता आला नाही, म्हणून एखाद्या खेळाडूला तुम्ही अपयशी नाही बोलू शकत, असे मत त्यांनी व्यक्त केले.
Virat Kohli आणखी 2 वर्ष कसोटी कर्णधारपदावर राहिला असता, परंतु अनेकांना त्याचे यश पचले नसते
India Todayला दिलेल्या मुलाखतीत शास्त्री म्हणाले,''विराट कोहलीनं कसोटी संघाच्या कर्णधारपदावर कायम राहायला हवे होते की नाही, तर हो. त्यानं आणखी दोन वर्ष तरी कसोटी संघाचे नेतृत्व संभाळले असते. पुढील दोन वर्षांत भारतीय संघ घरच्या मैदानावर खेळणार आहे आणि त्यांचा मुकाबला कसोटी क्रमवारीत 9-10 क्रमांकावर असलेल्या संघांसोबत आहे. त्यामुळे कर्णधार म्हणून त्याच्या नावावर 50-60 विजय नक्की नोंदवले गेले असते, परंतु हे अनेक लोकांना पचनी पडले नसते. त्यांची पोट दुखी सुरू झाली असती.''