इडियन प्रीमिअर लीग ( IPL 2021) स्थगित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर १४व्या पर्वाचा दुसरा टप्पा कधी व कुठे खेळला जाईल, याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. बीसीसीआय सप्टेंबर महिन्याची विंडो आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यासाठी पाहत आहे. इंग्लंड कौंटी क्लब्सनी लंडनमध्ये आयपीएलच्या उर्वरित सामन्यांच्या आयोजनाची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पण, इंग्लंडमध्ये आयपीएल खेळवणे बेकायदेशीर ठरेल, असे वृत्त समोर आले आहे. हॅम्पशायक कौंटीच्या प्रमुखांनी सांगितले की,''मी पण ही चर्चा ऐकली, परंतु इथे आयपीएल कशी होईल, याबाबत मीही खात्री देऊ शकत नाही. पण, सद्याच्या नियमानुसार इथे आयपीएलचे आयोजन होणे, बेकारदेशीर ठरेल.''
ESPN Cricinfo च्या माहितीनुसार MCC, Surrey, Warwickshire आणि Lancashire या कौंटी क्लब्सनी इंग्लंड क्रिकेट बोर्डाला पत्र पाठवून सप्टेंबरच्या दुसऱ्या टप्प्यातील वेळापत्रकाची विचारपूस केली. पण, याबाबत इंग्लंड क्रिकेट बोर्ड व MCCयांच्याकडून दुजोरा मिळाला नाही.
श्रीलंकेनं दिली आयपीएल आयोजनाची ऑफर
यूएई, लंडन अशी शहरांची चर्चा सुरू असताना श्रीलंका क्रिकेट बोर्डानं आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्याच्या आयोजनाची तयारी दर्शवली आहे. त्यांनी बीसीसीआयला मदतीसाठी प्रस्ताव ठेवला आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी २५०० कोटींच्या नुकसानीचा अंदाज व्यक्त केल्यानंतर लंकन बोर्ड पुढे आले. भारताचा माजी कर्णधार गांगुली म्हणाला,''अऩेक फेरबदल करावे लागणार आहेत. अऩ्य बोर्डांशीही चर्चा सुरू आहे आणि ट्वेंटी-20 वर्ल्ड कपपूर्वी उर्वरित आयपीएल खेळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अनेक गोष्टींवर विचार सुरू आहे आणि हळुहळू काम सुरू होईल. पण, जर आम्ही आयपीएलचा दुसरा टप्पा घेण्यास अपयशी ठरतो, तर जवळपास 2500 कोटींचे नुकसान होईल.''
Web Title: It Will be Illegal to Host IPL Here-English County Hampshire, Sri Lanka Cricket offers window for Indian Premier League
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.