नवी दिल्ली - दुसऱ्या महायुद्धामुळे जे घडले नाही ते कोविड-१९ महामारीमुळे घडले. रणजी ट्रॉफी स्पर्धा ८७ वर्षांत प्रथमच रद्द करण्यात आली.
भारतातील अव्वल स्थानिक स्पर्धा ज्याचा वापर करीत राष्ट्रीय संघात स्थान मिळविणाऱ्या अनेक माजी खेळाडूंनी सध्याच्या क्रिकेटपटूंप्रती सहानुभूती व्यक्त केली, पण १९३४-३५ मध्ये सुरुवात झाल्यानंतर प्रथमच रणजी ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन न करण्याच्या भारतीय क्रिकेट बोर्डाच्या (बीसीसीआय) अभूतपूर्व निर्णयावर सहमती दर्शविली.
पूर्वोत्तर राज्य सहभागी झाल्यानंतर स्थानिक स्पर्धेत ३८ प्रथम श्रेणी संघ झाले आहेत आणि प्रशिक्षक वसीम जाफर यांनी व्यावहारिक अडचणींचा हवाला दिला. स्थानिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये समावेश असलेले जाफर म्हणाले, ‘परिस्थिती अनुकूल असती तर रणजी ट्रॉफीचे आयोजन व्हावे, असे मला वाटले असते, पण ३८ संघांसह एवढे सर्व खेळाडू, स्थळ आणि उर्वरित शक्यता बघता हे कठीण आहे. याची मला कल्पना आहे.’
मुंबई व विदर्भातर्फे अनेक रणजी जेतेपद पटकाविणारे जाफर स्पर्धेचे आयोजन होत नसल्यामुळे निराशही आहेत. ते म्हणाले, ‘माझ्या मते हे दु:खद आहे. एवढ्या वर्षांत प्रथमच रणजी ट्रॉफी स्पर्धा होत नाही. विशेषत: जे खेळाडू लाल चेंडूने खेळतात, त्यांना जवळजवळ १८ महिने प्रथम श्रेणी स्पर्धा खेळण्याची संधी मिळणार नाही. दरम्यान, बीसीसीआयने स्थानिक खेळाडूंना रक्कम देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे काही अंशी आर्थिक समाधान मिळू शकते.
स्थानिक क्रिकेटमधील आणखी एक दिग्गज खेळाडू व भारतीय क्रिकेटर्स संघाचे (आयसीए) अध्यक्ष अशोक मल्होत्रा यांच्या मते रणजी ट्रॉफी आयोजनासाठी चार महिन्यांपर्यंत जैविक रूपाने सुरक्षित वातावरणात राहणे म्हणजे व्यावहारिक विचार नव्हता.
ते म्हणाले, ‘बीसीसीआयने आपल्या एजीएममध्ये चर्चा केली असून, नुकसानभरपाईचे पॅकेज तयार करण्यात येईल. मी अलीकडेच मुश्ताक अली ट्रॉफीसाठी बीसीसीआयतर्फे समालोचन केले होते आणि अडीच आठवडे जैविक रूपाने सुरक्षित वातावरणात होतो. माझ्यासाठी तो खडतर कालावधी होता. त्यामुळे ८०० स्थानिक क्रिकेटपटूंना साडेतीन महिने जैविक रूपाने सुरक्षित वातावरणात ठेवणे व्यावहारिक ठरू शकले नसते.’
बंगालचे गोलंदाजी प्रशिक्षक राणादेव बोस यांनी अलीकडेच जैविक रूपाने सुरक्षित वातावरणात राहण्याचा अनुभव घेतला.
याबाबत ते म्हणाले, ‘प्रत्येक दुसऱ्या दिवशी तुमची चाचणी घेतली जाते. तुमची ऑक्सिजन लेव्हल चेक करण्यात येते. तुमच्या फिरण्यावर मर्यादा असतात. रणजी ट्रॉफी जवळजवळ चार महिन्यांची स्पर्धा आहे. जैविक रूपाने सुरक्षित वातावरणाचा आदर करावा लागतो. अनेक खेळाडूंचे प्रौढ आई-वडील किंवा लहान मुले आहेत. तुम्हाला त्यांच्यासोबत भेटता येत नाही. तुम्हाला एकाच हॉटेलमध्ये महिनोमहिने राहावे लागते. मानसिक स्वास्थ्यासाठी ही चांगली स्थिती नाही. माझ्या मते, बीसीसीआयने विजय हजारे ट्रॉफीचे आयोजन करण्याचा योग्य निर्णय घेतला.’
‘खेळाडूने जे वाटते त्यासाठी माझी सहानुभूती आहे, पण माझ्या मते, बीसीसीआयने जो निर्णय घेतला तो सर्वांच्या सर्वश्रेष्ठ हिताचा आहे. बोर्डाने आपल्या संलग्न संघटनांना कळविले आहे की, संशोधित सत्रात विजय हजारे ट्रॉफी, सिनिअर महिला वन-डे स्पर्धा आणि अंडर-१९ गटातील विनू मंकड ट्रॉफीचे आयोजन करण्यात येईल. किमान दोन स्पर्धांचे आयोजन होत असल्यामुळे मला आनंद झाला. कमी सामन्यांसह रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या आयोजनाचा पर्याय होता का? याची मला कल्पना नाही, पण अंडर-१९ विश्वकप स्पर्धा लक्षात घेता बीसीसीआयला किमान वेळेत विनू मंकड ट्रॉफीचे आयोजन करायचे होते.’
- चंद्रकांत पंडित
Web Title: It would not have been fair to hold the Ranji Trophy during the Corona era.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.