- सुनील गावसकर लिहितात...
भारताने श्रीलंका दौ-यात यजमान संघाविरुद्ध शानदार कामगिरी केली आहे. यजमान संघ बलाढ्य नाही हे खरे आहे. त्यांची गोलंदाजी आंतरराष्टÑीय दर्जाच्या लायकीची नसली तरी लंका संघात अद्यापही काही चांगले फलंदाज आहेत. हे फलंदाज फॉर्मशी झुंज देत असल्यामुळे त्यांना मोकळेपणाने फटकेबाजी करण्याची संधी मिळालेली नाही. फलंदाजांसाठी उपयुक्त खेळपट्ट्यांवरदेखील हे फलंदाज अपयशी ठरले ही आश्चर्यकारक बाब म्हणावी लागेल. याचे सर्व श्रेय भारतीय गोलंदाजांना जाते. लंकेच्या फलंदाजांना त्यांनी स्थिरावण्याची संधीच दिली नाही.मागच्या सामन्यात जसप्रीत बुमराहच्या चेंडूतील विविधता पाहण्यासारखी होती. आवश्यकतेनुसार त्याने यॉर्कर टाकले. शार्दुल ठाकूर कारकिर्दीतील पहिल्याच सामन्यात प्रभावी जाणवला. पाटा खेळपट्टीवर त्याने यजमान फलंदाजांच्या मनात धडकी ठरविली. कुलदीप यादवची फिरकी ‘जादुई’ ठरली. हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर सुरुवातीला षटकार मारले गेले. तरीही संयमी मारा करणाºया हार्दिकने दोन बळी घेतलेच. यावरून त्याच्या संयमीवृत्तीचा परिचय घडला.भारतीय संघ व्यवस्थापनाने अपेक्षेनुरुप परिवर्तन करीत भुवनेश्वर कुमार, केदार जाधव आणि यजुवेंद्र चहल यांना राखीव बाकावर बसवून लोकेश राहुलला आणखी एक संधी दिली. विंडीज दौºयात सर्वाधिक धावा काढणाºया अजिंक्य रहाणेलादेखील बाहेरच बसावे लागले. रोहित आणि कर्णधार कोहली यांच्यात मोठी भागीदारी झाल्यानंतर राहुलला खेळपट्टीवर पाठविले जाईल, अशी अपेक्षा होती. यामुळे त्याला खेळपट्टीवर स्थिरावता आले असते.पण हार्दिक पांड्याला झुकते मापदेण्यात आले. या प्रयोगामुळे फारकाही फरक पडला नाही. पुढच्याच षटकार रोहित बाद झाल्याने राहुलला मैदानात जाण्याची संधी मिळाली. पण या वेळीदेखील राहुल स्थिरावू शकला नाही. धनंजयाच्या गुगलीला तो सलग तिसºयांदा बळी पडला.एखाद्या खेळाडूवर विश्वास दाखविणे ही वेगळी बाब पण फॉर्ममध्ये असलेल्या फलंदाजाच्या तुलनेत दुसºयाच खेळाडूला झुकते माप देणे योग्य नव्हे. या मालिकेत खेळाडू निवडीची पद्धत पाहता सर्व चांगल्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आल्यासारखे वाटते. यामुळे चांगल्या खेळाडूंच्या वैयक्तिक कामगिरीवर निश्चितपणे प्रभाव पडणार आहे. माझ्यामते संघात स्थान मिळविण्यासाठी अशा खेळाडूंनी स्वत:ची हेअर स्टाईल बदलणे गरजेचे आहे. याशिवाय काही शारीरिक कौशल्यदेखील दाखवावे लागेल, असे दिसते. (पीएमजी)