चेन्नई सुपर किंग्सला ( Chennai Super Kings) आयपीएलच्या इतिहासात प्रथमच प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यात अपयश आले. चेन्नईनं आयपीएलच्या १० मोसमात प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. त्यापैकी २०१०, २०११ व २०१८ मध्ये तर त्यांनी जेतेपदाचा चषक उंचावला. २०१२, २०१३, २०१५ आणि २०१९मध्ये त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अशा यशस्वी संघाला २०२०मध्ये प्ले ऑफमध्ये प्रवेश करता न येणं, हे धक्कादायक आहे. Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वात CSKकडून चुका झाल्या. त्यामुळे त्यांच्यावर टीका होताना दिसत आहे. पण, पती महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) संघावर होत असलेल्या टीकेला साक्षी धोनीनं ( Sakshi Dhoni) उत्तर देण्याचा प्रयत्न केला. तिनं एक भावनिक पोस्ट लिहून संघाचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न केला आणि CSKने तिचे आभारही मानले.
प्रत्युत्तरात फॅफ ड्यू प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाड यांनी चेन्नईला ४६ धावांची सलामी मिळवून दिली. ख्रिस मॉरिसनं सहाव्या षटकात १३ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह २५ धावा करणाऱ्या फॅफला बाद केले. संयमी खेळ करताना ऋतुराजनं अनुभवी फलंदाज अंबाती रायुडूसह दुसऱ्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी केली. रायुडू २७ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ३९ धावांवर युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. ऋतुराजनं ४२ चेंडूंत आयपीएलमधील पहिले अर्धशतक पूर्ण केले. ऋतुराजनं ५१ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकार खेचून नाबाद ६५ धावा केल्या, तर महेंद्रसिंग धोनी १९ धावांवर नाबाद राहिला. चेन्नईनं १८.४ षटकांत २ बाद १५० धावा करून सामना जिंकला.