शिखर धवन याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ जुलै महिन्यात तीन वन डे व तीन ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. श्रीलंकेला रवाना होण्यापूर्वी टीम इंडियाचे खेळाडू 14 दिवसांसाठी मुंबईत विलगिकरणात राहतील. या दौऱ्यासाठी निवडलेल्या संघावरून बरीच चर्चा सुरू आहे, जयदेव उनाडकट व राहुल टेवाटिया यांना वगळल्यानं टीकेचा सूर घुमत आहे. अशात या संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी महान फलंदाज राहुल द्रविड ( Rahul Dravid) याच्या खांद्यावर सोपवण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यावर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली ( Sourav Ganguly) यांनी मौन सोडले असून राहुल द्रविडच प्रशिक्षक असेल यावर त्यानं शिक्कामोर्तब केले. आता अधिकृतरित्या द्रविडच या दौऱ्यावर टीम इंडियाला मार्गदर्शन करणार, हे निश्चित झाले आहे. It's official! Rahul Dravid will be head coach of Team India on Sri Lanka tour, confirms Sourav Ganguly
शिखर धवनच्या नेतृत्वात जुलैमध्ये श्रीलंका दौरा करणारा संघ गुरुवारी जाहीर करण्यात आला. दुसरीकडे विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ आधीच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. तब्बल २५ वर्षानंतर बीसीसीआयने क्रिकेट विश्वावर पुन्हा वर्चस्व गाजविले आहे. इतिहासात डोकावले तर भारताने १९९८ ला देखील असेच दोन संघ पाठविल्याचे उदाहरण डोळ्यापुढे येते. भारताचा मूळ संघ पाकिस्तानविरुद्ध कॅनडात सहारा चषक खेळला, त्याचवेळी दुसरा संघ क्लालालम्पूर येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी झाला होता.
गांगुलीनं सांगितले की,''श्रीलंका दौऱ्यावर टीम इंडियाला राहुल द्रविड मार्गदर्शन करेल.'' सूत्रांच्या माहितीनुसार राहुल द्रविडसोबत राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत ( NCA) काम करणारी टीमच श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. भारतीय संघ - शिखर धवन ( कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडीक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनिष पांडे, हार्दिक पांड्या, नितीश राणा, इशान किशन ( यष्टिरक्षक), संजू सॅमसन ( यष्टिरक्षक), युझवेंद्र चहल, राहुल चहर, के गौथम, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, वरूण चक्रवर्थी, भुवनेश्वर कुमार ( उपकर्णधार), दीपक चहर, नवदीप सैनी, चेतन सकारीया.
स्पर्धेचे वेळापत्रक
वन डे मालिका - 13, 16 व 18 जुलै, कोलंबो
ट्वेंटी-20 मालिका - 21, 23 व 25 जुलै, कोलंबो