Join us  

आता तर ब्रश करण्यातही आनंद वाटतोय; रिषभ पंतने सांगितले अपघातानंतर नेमके काय शिकायला मिळाले

भारतीय संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत ( Rishabh pant Accident) याचा काही महिन्यांपूर्वी विचित्र अपघात झाला..

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 5:40 PM

Open in App

भारतीय संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत ( Rishabh pant Accident) याचा काही महिन्यांपूर्वी विचित्र अपघात झाला.. या अपघातातरिषभ पंतला बराच मार लागला आणि तो आता बराच काळ क्रिकेटपासून दूर राहणार आहे. काही दिवसांपूर्वी त्याने एक फोटो पोस्ट केला होता आणि त्यात तो कुबड्यांच्या सहाय्याने चालत असल्याचे दिसला. त्यात त्याने प्रकृती सुधारत असल्याचे अपडेट्स दिले होते. ३० डिसेंबर २०२२ मध्ये पहाटे ५.३० वाजता दिल्ली-डेहरादून हायवेवर रिषभच्या गाडीचा भिषण अपघात झाला होता. 

या अपघातामुळे त्याला इंडियन प्रीमिअर लीग २०२३ सोबतच वन डे वर्ल्ड कप स्पर्धेलाही मुकावे लागू शकते. तो पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी बराच कालावधी लागू शकतो. अपघातानंतर रिषभने आज प्रथमच IANS ला मुलाखत दिली आणि त्या अपघाताने आयुष्य कसे बदलले याबाबत तो बोलला. "आज मी माझ्या आयुष्याचा पुरेपूर आनंद घेत आहे, त्यालाच मी महत्त्व देतोय आणि यामध्ये आपण आपल्या दैनंदिन दिनचर्येमध्ये दुर्लक्षित केलेल्या छोट्या छोट्या गोष्टींचा समावेश होतो. आज प्रत्येकजण काहीतरी साध्य करण्यासाठी खूप धडपडत आहे आणि खूप मेहनत करत आहे, परंतु आपण छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेण्यास विसरलो आहोत. जे आम्हाला प्रत्येक दिवशी आनंद देतात", असे त्याने सांगितले.

"विशेषत: माझ्या अपघातानंतर, मला दररोज दात घासण्यात तसेच सूर्याखाली बसण्यातही आनंद मिळत आहे.  ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करत असताना जीवनातील काही गोष्टींना आपण गृहित धरतो.  माझी सर्वात मोठी जाणीव आणि संदेश असा असेल की दररोज जगा आणि प्रत्येक गोष्टीचा आनंद लुटा. हीच मानसिकता मी त्या अपघातानंतर स्वीकारली आहे आणि माझ्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा आनंद लुटता येणे हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे", असेही तो पुढे म्हणाला.

रिषभने ३३ कसोटी सामन्यांत ४३.६७च्या सरासरीने २२७१ धावा केल्या आहेत आणि त्यात ५ शतकं व ११ अर्धशतकांचा समावेश आहे. ३० वन डे व ६६ ट्वेंटी-२०त अनुक्रमे ८६५ व ९८७ धावा त्याच्या नावावर आहेत. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :रिषभ पंतभारतीय क्रिकेट संघअपघात
Open in App