Join us  

Virat Kohli heartfelt post for Yuvraj Singh : युवराज सिंगचं पत्र वाचून विराट कोहली भावनिक झाला; युवीसाठी खास मॅसेज केला, म्हणाला... 

Virat Kohli heartfelt post for Yuvraj Singh : भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याने मंगळवारी विराट कोहलीसाठी हस्तलिखित पत्र आणि गोल्डन शूज भेट म्हणून पाठवले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 12:26 PM

Open in App

Virat Kohli heartfelt post for Yuvraj Singh : भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याने मंगळवारी विराट कोहलीसाठी हस्तलिखित पत्र आणि गोल्डन शूज भेट म्हणून पाठवले. युवीचं हे पत्र व भेटवस्तू मिळताच माजी कर्णधार विराटने त्याचे आभार मानले आणि त्याच्यासाठी खास मॅसेज पोस्ट केला.  

त्याने लिहिलं की,''या प्रेमासाठी खूप आभारी आहे यूवी पा... पहिल्या दिवसापासून माझी कारकिर्दी उलगडताना पाहिलेल्या एखाद्या व्यक्तीकडून अशी भेट येणे, याचे माझ्यासाठी खूप महत्त्व आहे. तुझं आयुष्य आणि कर्करोगातून तुझे पुनरागमन हे फक्त क्रिकेटपटूंसाठी नव्हे तर सर्व क्षेत्रातील लोकांसाठी नेहमीच प्रेरणादायी होते आणि राहील. तू कोण आहेस, हे मी ओळखतो. तू नेहमीच खूप उदार आणि तुझ्या सभोवतालच्या लोकांची काळजी घेतोस. आता आपण दोघंही पालक झालो आहोत आणि हा किती मोठा आशीर्वाद आहे, हे मला माहीत आहे. आनंदी आणि सुंदर आयुष्यासाठी मी तुला शुभेच्छा देतो. देव तुझ्या पाठीशी नेहमी राहो.. यूवी पा, रब राखा.''  

युवीने काय लिहिले होते...

'तुझी शिस्त आणि मैदानावरील महत्त्वाकांक्षा आणि खेळाप्रति असलेले समर्पण या देशातील प्रत्येक तरुण मुलाला बॅट उचलण्याची आणि एक दिवस निळी जर्सी घालण्याचे स्वप्न पाहण्यास प्रेरित करते. तू प्रत्येक वर्षी तुझा क्रिकेटचा स्तर उंचावला आहेस आणि आधीच इतके काही साध्य केले आहेस की, तुझ्या कारकिर्दीतील नवीन अध्याय सुरू करताना पाहून मला आणखी आनंद होतो. तू एक महान कर्णधार आणि उत्कृष्ट लीडर आहेस.'

 

'मी तुझ्याकडून आणखी अनेक विक्रमांची अपेक्षा करतो आहे. एक सहकारी आणि त्याहूनही अधिक मित्र म्हणून तुझ्यासोबत एक नाते जुळले आहे आणि त्याचा मला आनंद आहे. धावा करणे, लोकांची फिरकी घेणे, जेवताना टिंगळटवाळी करणे, पंजाबी गाण्यांवर नाचणे आणि चषक जिंकणे, हे सर्व तुझ्यासोबत मी केले आहे. माझ्यासाठी तू नेहमीच चीकू राहशील आणि जगासाठी किंग कोहली. तुझ्यातील आग नेहमी तेवत ठेव. तू सुपरस्टार आहेस. तुझ्यासाठी हा खास गोल्डन बूट. देशाला तुझा अभिमान आहे.’

टॅग्स :विराट कोहलीयुवराज सिंग
Open in App