T20I क्रिकेट मॅचेसमध्ये नवं नवे विक्रम प्रस्थापित झाल्याचे पाहायला मिळते. कधी कधी एखादा खेळाडू किंवा संघ काही अविश्वसनिय कामगिरीमुळे चर्चेत येतो. बांगलादेश विरुद्धच्या घरच्या मैदानातील टी-२० सामन्यात भारतीय संघाने अनेक विक्रम प्रस्थापित केल्याचेही पाहायला मिळाले होते. टी-२० क्रिकेटमध्ये अनेकदा सर्वोच्च धावसंख्या हा विषय अधिक चर्चेत असतो. पण आता निच्चांकी धावसंख्येसह सेट झालेल्या लाजिरवाण्या विक्रमाची चर्चा रंगताना दिसते. आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात एक संघ अवघ्या ७ धावांत ऑल आउट झाला आहे. आंतरराष्ट्रीय टी क्रिकेटच्या इतिहासातील ही सर्वात निच्चांकी धावसंख्या ठरलीये.
कोणत्या सामन्यात झाला लाजिरवाणा वर्ल्ड रेकॉर्ड
ICC पुरुष T20 वर्ल्ड कप आफ्रिका सब रीजनल क्वालीफायर C 2024 मध्ये नायजेरिया आणि आयव्हरी कोस्ट या दोन संघात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग करताना नायजेरिया संघाने निर्धारित २० षटकात ४ विकेट्सच्या मोबदल्यात २७१ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना आयव्हरी कोस्ट संघ ७.३ षटकात ७ धावांत आटोपला. याआधी आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील सर्वात निच्चांकी धावसंख्येचा विक्रम हा मंगोलियाच्या नावे होता. हा संघ १० धावांत ऑल आउट झाला होता.
७ खेळाडूंच्या पदरी भोपळा, अन्...
आयव्हरी कोस्ट संघातील ११ पैकी ७ खेळाडूंच्या पदरी भोपळा आला. या संघाकडून ४ धावा ही एका खेळाडूनं केलेली सर्वोच्च धावसंख्या ठरली. अन्य तीन फलंदाजांनी प्रत्येकी एक एक धाव केली. नायजेरियाच्या संघानं हा सामना २६४ धावांनी जिंकत इतिहास रचला. आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील हा तिसरा सर्वात मोठा विजय आहे.
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील निच्चांकी धावसंख्येचा रेकॉर्ड
- आयव्हरी कोस्ट ७.३ षटकात १७ धावा विरुद्ध नायजेरिया (२४ नोव्हेंबर २०२४)
- मंगोलिया १० षटकात १० धावा विरुद्ध सिंगापूर (५ सप्टेंबर २०२४)
- आयल ऑफ मॅन ८.४ षटकात १० धावा विरुद्ध स्पेन (२६ फेब्रुवारी २०२३)
- मंगोलिया ८.२ षटकात १२ धावा विरुद्ध जपान (८ मे २०२४)
- मंगोलिया १४.२ षटकात १७ धावा विरुद्ध हाँगकाँग (३१ ऑगस्ट २०२४)
Web Title: Ivory Coast Made History By Recording The Lowest Ever T20i Total In A Mens T20I Match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.