Join us  

अय्यर, ईशान किशन केंद्रीय करारातून बाहेर; बीसीसीआयने केला गेम : युवा चेहऱ्यांवर विश्वास

स्थानिक सामन्यांकडे पाठ फिरविणाऱ्या या दोन्ही खेळाडूंचा बोर्डाने योग्यवेळी  ‘करेक्ट कार्यक्रम’ केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 6:00 AM

Open in App

नवी दिल्ली : बीसीसीआयने बुधवारी २०२३-२०२४ च्या मोसमासाठी केंद्रीय करार जाहीर केले. या यादीतून श्रेयस अय्यर आणि ईशान किशन यांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. स्थानिक सामन्यांकडे पाठ फिरविणाऱ्या या दोन्ही खेळाडूंचा बोर्डाने योग्यवेळी  ‘करेक्ट कार्यक्रम’ केला. या दोघांनी रणजी करंडक सामने खेळण्याचे टाळून आयपीएलची तयारी सुरू केली होती. त्यावर बोर्डाचे सचिव जय शाह यांनी गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला होता.

बोर्डाच्या नव्या करारात ३० खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे.  कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह यांना अ प्लस श्रेणीत कायम ठेवले. या सर्वांना ७  कोटी मिळतील. अ श्रेणीतील खेळाडूंना ५ कोटी, ब श्रेणीतील खेळाडूंना ३ तर क श्रेणीतील खेळाडूंना १ कोटी मिळतील.

 मोहम्मद सिराज, लोकेश राहुल, आणि शुभमन गिल यांना अ श्रेणीत बढती देण्यात आली. ऋषभ पंत आणि अक्षर पटेल यांनी अ श्रेणीतून पदावनती करून त्यांना ब श्रेणीत टाकण्यात आले आहे. युवा यशस्वी जैस्वालला ब श्रेणीत स्थान मिळाले. हा करार १ ऑक्टोबर २०२३ पासून ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत असेल. 

गोलंदाजांची शिफारसनिवड समितीने आकाश दीप, विजयकुमार विशाक, उमरान मलिक, यश दयाल, विद्वत कावेरप्पा या वेगवान गोलंदाजांची करारासाठी बोर्डाकडे शिफारसदेखील केली.

तर जुरेल-सरफराजशी करारबीसीसीआयनुसार ध्रुव जुरेल आणि सरफराज खान यांनी आतापर्यंत दोन कसोटी सामने खेळले. हे दोघे धर्मशाला येथे इंग्लंडविरूद्ध पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना खेळल्यास त्यांना केंद्रीय करारात क श्रेणीत स्थान दिले जाईल.

अ  प्लस श्रेणीरोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा.

अ  श्रेणीरविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, लोकेश राहुल, शुभमन गिल, हार्दिक पांड्या.

ब  श्रेणीसूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, कुलदीप यादव, अक्षर पटेल, यशस्वी जैस्वाल.

क  श्रेणीरिंकूसिंग, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शार्दूल ठाकूर, शिवम दुबे, रवी बिश्नोई, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, केएस भरत, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि रजत पाटीदार.  

टॅग्स :बीसीसीआयइशान किशनश्रेयस अय्यर