Join us  

जडेजा, विहारी यांचे पुनरागमन, इंग्लंड दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ जाहीर

डब्ल्यूटीसी फायनल, इंग्लंड दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2021 1:00 AM

Open in App

नवी दिल्ली : फिटनेच्या समस्येवर मात करणारा अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि फलंदाज हनुमा विहारी यांची पुढील महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या डब्ल्यूटीसी अंतिम सामना आणि त्यानंतरच्या इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघात निवड करण्यात आली आहे. इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल.२० सदस्यांच्या संघात निवडकर्त्यांनी अभिमन्यू ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा आणि अर्जन नगवासवाला यांना राखीव खेळाडूंमध्ये स्थान दिले. ॲपेंडिक्सची शस्त्रक्रिया झालेला लोकेश राहुल आणि कोरोनाबाधित रिद्धिमान साहा यांना देखील संघात ठेवण्यात आले असून, हे दोघे फिट असतील तरच संघासोबत जाऊ शकतील.जडेजा आणि विहारी यांना ऑस्ट्रेलिया दैऱ्यात दुखापत झाली होती. न्यूझीलंडविरुद्ध विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना इंग्लंडच्या साऊदम्पटन मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध १८ जूनपासून खेळला जाईल. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध मालिकेला ४ ऑगस्टपासून नॉटिंघममध्ये सुरुवात होणार आहे. दुसरा कसोटी सामना लॉर्ड्‌सवर १२ ते १६ ऑगस्ट, तिसरा कसोटी सामना लीड्‌स येथे २५ ते २९ ऑगस्ट, तसेच चौथा कसोटी सामना २ ते ६ सप्टेंबर या कालावधीत ओव्हलवर खेळविला जाईल. पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना १० ते १४ सप्टेंबर या काळात मॅन्चेस्टर मैदानावर खेळला जाईल.

भारतीय कसोटी संघ

सलामीवीर : रोहित शर्मा, शुभमन गिल आणि मयंक अग्रवाल.मधली फळी : चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), लोकेश राहुल (फिट असल्यास), अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी.यष्टिरक्षक : ऋषभ पंत आणि रिद्धिमान साहा (फिट असल्यास).अष्टपैलू व फिरकीपटू : रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल.

वेगवान गोलंदाज : जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर आणि उमेश यादव.राखीव : अभिमन्यू ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्जन नगवासवाला.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघकोरोना वायरस बातम्याइंग्लंड