नवी दिल्ली : आॅफस्पिनर रविचंद्रन आश्विन हा इराणी करंडक क्रिकेट सामन्यात शेष भारताकडून रवींद्र जडेजाचे स्थान घेणार आहे. इराणी करंडकाचा सामना नागपुरात जामठा स्टेडियमवर १४ ते १८ मार्च या कालावधीत रणजी चॅम्पियन विदर्भ विरुद्ध शेष भारत यांच्यात खेळला जाईल.
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, जडेजाच्या मांसपेशी ताणल्या गेल्यामुळे त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. एक आठवडा विश्रांतीचा सल्ला मिळाल्यामुळे आश्विन अलीकडे देवधर करंडक सामन्यात खेळला नव्हता. आश्विन आता खेळण्यास सज्ज आहे. आश्विन आणि जडेजा हे भारतीय कसोटी संघाचे नियमित खेळाडू आहेत. वन-डेत मात्र या दोघांचे स्थान कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांनी घेतले, हे विशेष. (वृत्तसंस्था)
Web Title: Jadeja's place to take Ashwin in the Irani Cup
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.