नवी दिल्ली : आॅफस्पिनर रविचंद्रन आश्विन हा इराणी करंडक क्रिकेट सामन्यात शेष भारताकडून रवींद्र जडेजाचे स्थान घेणार आहे. इराणी करंडकाचा सामना नागपुरात जामठा स्टेडियमवर १४ ते १८ मार्च या कालावधीत रणजी चॅम्पियन विदर्भ विरुद्ध शेष भारत यांच्यात खेळला जाईल.बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, जडेजाच्या मांसपेशी ताणल्या गेल्यामुळे त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. एक आठवडा विश्रांतीचा सल्ला मिळाल्यामुळे आश्विन अलीकडे देवधर करंडक सामन्यात खेळला नव्हता. आश्विन आता खेळण्यास सज्ज आहे. आश्विन आणि जडेजा हे भारतीय कसोटी संघाचे नियमित खेळाडू आहेत. वन-डेत मात्र या दोघांचे स्थान कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांनी घेतले, हे विशेष. (वृत्तसंस्था)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- इराणी करंडकात आश्विन घेणार जडेजाचे स्थान
इराणी करंडकात आश्विन घेणार जडेजाचे स्थान
आॅफस्पिनर रविचंद्रन आश्विन हा इराणी करंडक क्रिकेट सामन्यात शेष भारताकडून रवींद्र जडेजाचे स्थान घेणार आहे. इराणी करंडकाचा सामना नागपुरात जामठा स्टेडियमवर १४ ते १८ मार्च या कालावधीत रणजी चॅम्पियन विदर्भ विरुद्ध शेष भारत यांच्यात खेळला जाईल.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 1:31 AM