ENG vs SA Test : James Andersonने इतिहास घडविला, घेतल्या ९५० विकेट्स! इंग्लंडने तीन दिवसांत जिंकली कसोटी

England vs South Africa 2nd Test : यजमान इंग्लंडने ०-१ अशा पिछाडीवरून जोरदार मुसंडी मारताना दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा सुफडा साफ केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 11:10 PM2022-08-27T23:10:08+5:302022-08-27T23:10:24+5:30

whatsapp join usJoin us
James Anderson becomes the first pacer to complete 950 International wickets , England have defeated South Africa by an innings and 85 runs to level the Test series by 1-1 | ENG vs SA Test : James Andersonने इतिहास घडविला, घेतल्या ९५० विकेट्स! इंग्लंडने तीन दिवसांत जिंकली कसोटी

ENG vs SA Test : James Andersonने इतिहास घडविला, घेतल्या ९५० विकेट्स! इंग्लंडने तीन दिवसांत जिंकली कसोटी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

England vs South Africa 2nd Test : यजमान इंग्लंडने ०-१ अशा पिछाडीवरून जोरदार मुसंडी मारताना दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा सुफडा साफ केला. कर्णधार बेन स्टोक्सची शतकी खेळी अन् जेम्स अँडरसनच्या ( James Anderson) ऐतिहासिक कामगिरीच्या जोरावर इंग्लंडने ही कसोटी १ डाव ९५ धावांनी जिंकून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. अँडसनने या सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ९५०  विकेट्सचा टप्पा ओलांडला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करताना तो जगातला पहिला जलदगती गोलंदाज ठरला. त्याने ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्ग्राथ ( ९४९ विकेट्स) चा विक्रम मोडला.


दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव १५१ धावांत गुंडाळल्यानंतर इंग्लंडने ९ बाद ४१५ धावांवर पहिला डाव घोषित केला. इंग्लंडच्या जेम्स अँडरसन ( ३-३२) व स्टुअर्ट ब्रॉड ( ३-३७) यांनी पहिल्या डावात आफ्रिकेला इंगा दाखवला. बेन स्टोक्सनेही दोन विकेट्स घेतल्या. इंग्लंडच्या पहिल्या डावात बेन स्टोक्सने १०३ व बेन फोक्सने नाबाद ११३ धावांची खेळी केली. त्यामुळेच इंग्लंडने पहिल्या डावात मोठी आघाडी घेतली. आफ्रिकेची दुसऱ्या डावातही दाणादाण उडाली. १७९ धावांवर त्यांचा संघ माघारी परतला अन् इंग्लंडे डावाने व ९५ धावांनी सामना जिंकला,. ऑली रॉबिन्सनने सर्वाधिक ४, अँडरसनने ३ व बेन स्टोक्सने २ विकेट्स घेतल्या.

अँडरसनने आफ्रिकेविरुद्ध कसोटी १०० विकेट्सचा टप्पाही ओलांडला. शेन वॉर्न ( १३०) व मुथय्या मुरलीधरन ( १०४) यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा तो तिसरा गोलंदाज ठरला. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये मुथय्या मुरलीधरन १३४७ विकेट्ससह अव्वल स्थानी आहे. त्यानंतर शेन वॉर्न ( १००१), अनिल कुंबळे ( ९५६) , जेम्स अँडरसन ( ९५०) व ग्लेन मॅक्ग्राथ ( ९४९) अशी क्रमवारी येते. 

Web Title: James Anderson becomes the first pacer to complete 950 International wickets , England have defeated South Africa by an innings and 85 runs to level the Test series by 1-1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.