मुंबई, आयपीएल 2019 : किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार आर अश्विन सध्या चर्चेत आहे तो मांकड रनआउटमुळे... राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात अश्विनने सलामीवीर जोस बटलरला मांकड नियमानुसार धावबाद केले. त्याच्या या कृतीवर माजी क्रिकेटपटूंनी नाराजी व्यक्त केली. बटलरच्या या विकेटने राजस्थानने हातचा सामना गमावला. सोशल मीडियावर अश्विनवर नाराजी करणारे मॅसेजही फिरले. पण, आपल्या सहकाऱ्याला अशा पद्धतीनं बाद करणाऱ्या अश्विनवर इंग्लंडचा गोलंदाज जेम्स अँडरसन याने वेगळ्या पद्धतीने नाराजी प्रकट केली. त्याने चक्क अश्विनचा फोटो मशीनमध्ये टाकून त्याचे असंख्य तुकडे केले.
185 धावांचा पाठलाग करताना राजस्थानने फक्त एका फलंदाजांच्या मोबदल्यात शतक पूर्ण केले होते. पण त्यानंतर त्यांचे 70 धावांमध्ये त्यांनी तब्बल आठ फलंदाज गमावले. पण या सामन्याचा जो बटरलची विकेट टर्निंग पॉईंट ठरली. राजस्थानने बाराव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर शतक पूर्ण केले होते. पण त्यानंतर राजस्थानचा डोलारा कोसळला. मोठे फटके मारण्याच्या नादात राजस्थानच्या फलंदाजांनी आपल्या विकेट्स पंजाबला आंदण दिल्या आणि पराभव ओढवून घेतला.
पाहा व्हिडीओ...