Join us

Cricket is Back: जेम्स अँडरसननं घेतली विकेट अन् खेळाडूंचं सोशल डिस्टन्सिंग सेलिब्रेशन

इंग्लंडचा गोलंदाज जेम्स अँडरसननं टीम स्टोक्सचे प्रतिनिधित्व करताना दोन विकेट्स घेतल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2020 15:28 IST

Open in App

कोरोना व्हायरसमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा स्थगित कराव्या लागल्या. पण, 8 जुलैपासून इंग्लंड-वेस्ट इंडिज मालिकेतून पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात होत आहे. कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिजचे खेळाडू इंग्लंडमध्ये दाखल झाले आहेत. मालिकेपूर्वी दोन्ही आपापल्या खेळाडूंची दोन गटात विभागणी करून सराव सामना खेळत आहेत. कोरोना व्हायरसमुळे क्रिकेटमधील अनेक नियम बदलले आणि आता सेलिब्रेशनवरही अंकुश आणले आहे. इंग्लंडच्या खेळाडूंच्या सराव सामन्यात त्याची प्रचिती आली. 

एजीस बाऊल येथी टीम बटलर आणि टीम स्टोक्स यांच्यात तीन दिवसांचा सराव सामना सुरु आहे. इंग्लंडचा गोलंदाज जेम्स अँडरसननं टीम स्टोक्सचे प्रतिनिधित्व करताना दोन विकेट्स घेतल्या. अँडरसननं या विकेट्सचे सेलिब्रेशन सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून केले.

पाहा व्हिडीओ..  अँडरसननं 18 षटकांत दोन विकेट्स घेतल्या. टीम बटलरने पहिल्या दिवसअखेर 5 बाद 287 धावा केल्या. जेम्स ब्रेसीनं 85 धावा केल्या. बेन स्टोक्सनं 8 षटकं टाकली आणि त्याला एकही विकेट घेता आली नाही.   

न्यूड फोटो शेअर करणाऱ्या महिला खेळाडूवर कारवाई; म्हणाली, स्वातंत्र्यावर घाला!

Video : ... म्हणून अजिंक्य रहाणेनं मानले सरकारचे आभार, शेतकऱ्यांबद्दल काढले गौरवौद्गार

मानलं तुम्हाला; रितेश देशमुख आणि जेनेलियाचा अवयवदानाचा संकल्प!

कोरोनामुक्त होताच शाहिद आफ्रिदी काश्मीर मुद्द्यावर बरळला; केलं मोठं विधान

टॅग्स :इंग्लंडवेस्ट इंडिज