जे 38 वर्षांत कुणालाच नाही जमले, ते जेम्स अँडरसनने करून दाखवले!

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत यजमानांनी निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. लॉर्ड्स कसोटी गाजली ती जेम्स अँडरसनच्या विक्रमी कामगिरीने.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 01:43 PM2018-08-14T13:43:13+5:302018-08-14T13:43:49+5:30

whatsapp join usJoin us
James Anderson climb on 900+ mark | जे 38 वर्षांत कुणालाच नाही जमले, ते जेम्स अँडरसनने करून दाखवले!

जे 38 वर्षांत कुणालाच नाही जमले, ते जेम्स अँडरसनने करून दाखवले!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई - भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत यजमानांनी निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. लॉर्ड्स कसोटी गाजली ती जेम्स अँडरसनच्या विक्रमी कामगिरीने. लॉर्ड्सवर शंभर विकेट घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला. त्याशिवाय 550 विकेटचा पल्ला पार करणारा तो इंग्लंडचा पहिला गोलंदाज ठरला. याच कामगिरीमुळे त्याने ICCच्या कसोटी गोलंदाजांमध्ये विक्रमी गुणांसह अव्वल स्थान पटकावले. 38 वर्षांनंतर इंग्लंडच्या एखाद्या गोलंदाजाने 900 गुणांचा टप्पा ओलांडण्याचा पराक्रम केला. 

अँडरसनच्या खात्यात 903 गुण आहेत आणि 1980 मध्ये इयान बॉथम यांनी 911 गुणांची कमाई केली होती. लॉर्ड्स कसोटीत त्याने दोन्ही डावांत मिळून 43 धावा देत 9 विकेट घेतल्या होत्या.  



900 गुणांचा टप्पा ओलांडणारा अँडरसन हा नववा इंग्लिश गोलंदाज आहे. सिडनी बॅर्नेस (1914) 932 गुणांसह आघाडीवर आहेत. त्यापाठोपाठ जॉर्ज लोहमॅन (931 गुण, 1896), टॉनी लॉक ( 912 गुण, 1958), इयान बॉथम ( 911 गुण, 1980), डेरेक उंसरवूड ( 907 गुण, 1971) आणि अॅलेक बेडसेर ( 903 गुण, 1953) यांचा क्रमांक येतो. 

Web Title: James Anderson climb on 900+ mark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.