Join us  

जेम्स अँडरसन इंग्लंडसाठी ‘ब्रह्मास्त्र’ ठरेल

कसोटी क्रिकेटमधील सर्वांत यशस्वी वेगवान गोलंदाज ठरलेला जेम्स अँडरसनचे कौतुक करताना इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुट याने, ‘आमच्या गोलंदाजीचा आधारस्तंभ असलेला जेम्स जगातील फलंदाजांमध्ये दहशत माजविण्यास उपयुक्त आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2018 4:19 AM

Open in App

लंडन : कसोटी क्रिकेटमधील सर्वांत यशस्वी वेगवान गोलंदाज ठरलेला जेम्स अँडरसनचे कौतुक करताना इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुट याने, ‘आमच्या गोलंदाजीचा आधारस्तंभ असलेला जेम्स जगातील फलंदाजांमध्ये दहशत माजविण्यास उपयुक्त आहे,’ असे म्हटले आहे.अँडरसनने आॅस्ट्रेलियाचा ग्लेन मॅकग्रा याला मागे टाकून कसोटीतील सर्वांत यशस्वी गोलंदाज होण्याचा मान संपादन केला आहे. त्याच्या नावावर ५६४ बळींची नोंद असून मुथय्या मुरलीधरन ८०० बळी, शेन वॉर्न ७०८ आणि अनिल कुंबळे ९१९ बळी हे त्याच्या पुढे आहेत. मालिका जिंकल्यानंतर रुट म्हणाला,‘ जेम्स मूडममध्ये असतो तेव्हा कित्येक षटके त्याच्याकडून गोलंदाजी करुन घेऊ शकता. तो सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करीत असून वेगाने पुढे जात आहे. भविष्यात अनेक मालिकांमध्ये तो आमच्या गोलंदाजीचा आधारस्तंभ ठरेल आणि जगातील अव्वाल दर्जाच्या फलंदाजांमध्ये दहशत पसरवेल, अशी आशा आहे.’कसोटीत अव्वल असलेल्या भारताला नमविणे, हे इंग्लंडच्या कसोटी क्रिकेटमधील प्रगतीचे लक्षण असल्याचे संबोधून रुट पुढे म्हणाला, ‘श्रीलंका आणि वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकांमध्ये आम्ही विजयाची लय कायम राखणार आहोत. ’फिरकी गोलंदाज आदिल राशीद हा देखील क्षमतेच्या बळावर संघात असल्याचे रुटने मत व्यक्त केले. ‘लोकेश राहुल आणि रिषभ पंत यांनी शतके ठोकून अमाच्यापुढे अडचण निर्माण केली होती, पण आदिलने दोघांचीही दांडी गुल केली. माझे दोन्ही मित्र अ‍ॅलिस्टर कूकच्या करकिर्दीची सांगता आणि जेम्सचा धडाका, हे माझ्यासाठी मोठे बक्षीस आहे,’ असे रुट म्हणाला. त्याचप्रमाणे, ‘कूकची नेहमी मला उणीव जाणवेल,’ असेही रुटने सांगितले. (वृत्तसंस्था)

टॅग्स :जेम्स अँडरसन