सेंच्युरियन : इंंग्लंडचा जेम्स अॅन्डरसन हा १५० हून अधिक सामने खेळणारा जगातील नववा कसोटीपटू बनला आहे. त्याचवेळी असा पराक्रम करणारा तो पहिला गोलंदाज ठरला. दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन करणाऱ्या अँडरसनने द. आफ्रिकेविरुद्ध गुरुवारी १५० व्या सामन्यात पदार्पण केले. त्याने पहिल्याच चेंडूवर डीन एल्गरला बाद करीत हा क्षण संस्मरणीय ठरवला.
कसोटीत ५७६ गडी बाद करणारा अँडरसन नवव्या स्थानी असून सचिन (२००), रिकी पाँटिंग व स्टीव्ह वॉ (१६८), जॅक कालिस (१६६), शिवनारायण चंद्रपॉल व राहुल द्रविड (१६४), अॅलिस्टर कूक (१६१), अॅलन बॉर्डर (१५६) हे अँडरसनपेक्षा अधिक सामने खेळले आहेत. कसोटीत पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद होण्याची नववी घटना ठरली. याआधी इंग्लंडचा हर्बर्ट सटक्लिफ व स्टॅन वर्थिग्टन, द. आफ्रिकेचा जिमी कूक, बांगलादेशचा हनान सरकार, भारताचा वसीम जाफर, न्यूझीलंडचा टिम मॅकिनटोश व भारताचा लोकेश राहुल पहिल्या चेंडूवर बाद झाले होते.गोलंदाज म्हणून १५० कसोटी सामना खेळताना अँडरसनने विश्वविक्रमी कामगिरी केली. गोलंदाजांच्या बाबतीत सर्वाधिक कसोटी सामने खेळणाऱ्यांमध्ये आॅस्टेÑलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न दुसºया स्थानी असून त्याने १४५ कसोटी खेळले आहेत. यानंतर इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड (१३५), श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन (१३३) आणि भारताचा अनिल कुंबळे (१३२) हे अनुक्रमे तिसºया, चौथ्या व पाचव्या स्थानी आहेत.