सिडनी : ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू जेम्स फॉल्कनर रविवारी चांगलाच चर्चेत राहिला. पण, क्रिकेटच्या मैदानावरील कामगिरीमुळे नाही, तर एका वेगळ्याच कारणानं. सोशल मीडियावर त्याच्या एका फोटोने चांगलाच गोंधळ निर्माण केला आणि त्यानंतर फॉल्कनर 'गे' ( समलैंगिक) आहे की काय, अशी चर्चा सुरू झाली. सोशल मीडियावरील हे वादळ थांबवण्यासाठी आपण 'गे' नसल्याचा खुलासा फॉल्कनरला करावा लागला.
फॉल्कनरने पोस्ट केलेल्या एका फोटोखाली लिहीले होते की,''वाढदिवस साजरा करण्यासाठी मी माझ्या आई आणि बॉयफ्रेंड सोबत आहे.'' यानंतर फॉल्कनर गे असल्याची चर्चा सुरू झाली आणि त्यावर त्याला स्पष्टीकरण द्यावे लागले. तो म्हणाला,''मी केलेल्या पोस्टचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. मी गे नाही आहे. मात्र, LGBT कम्युनिटीला मिळणारा पाठींबा पाहून मला आऩंद नक्की होतो.''
''प्रेम हे प्रेम असतं, याची जाणीव कायम असायला हवी. रॉब हा माझा चांगला मित्र आहे. आमच्या मैत्रीला काल पाच वर्ष पूर्ण झाली,'' असेही फॉल्कनरने लिहिले.
याआधी इंग्लंडच्या स्टीव्हन डेव्हिसला असा खुलासा करावा लागला होता. 2011साली पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळल्यानंतर दिलेल्या मुलाखतीत त्याने गे असल्याचे सांगितले होते.
Web Title: James Faulkner denies reports he’s gay,
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.