सप्टेंबर २०१९नंतर प्रथमच अमेरिकेच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून वन डे सामना खेळणाऱ्या जस्करन मल्होत्रानं दमदार खेळ केला. २००३मध्ये हिमाचल प्रदेशच्या १५ वर्षांखालील संघाकडून विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्लीविरुद्ध पदार्पण केले होते. पण, त्याला भारतीय क्रिकेटमध्ये फार संधी मिळाली नाही. त्यानंतर तो अमेरिकेकडून खेळू लागला. अमेरिकेच्या संघात दोन वर्षांनंतर पुनरागमन करणाऱ्या जस्करननं आंतरराष्ट्रीय वन डे सामन्यात तुफान फटकेबाजी केली. त्यानं पपुआ न्यू गिनीविरुद्धच्या सामन्यात अखेरच्या षटकात सलग सहा षटकार खेचले. त्याच्या दमदार खेळीच्या जोरावर अमेरिकेनं १३४ धावांनी विजय मिळवला.
रोहित शर्मा, रवींद्र जडेजासह सहा खेळाडूंवर बीसीसीआय व आयपीएल फ्रँचायझींची नजर; जाणून घ्या महत्त्वाचं कारण
पपुआ न्यू गिनीचा मध्यमगती गोलंदाज गौडी टोका यानं टाकलेल्या ५०व्या षटकात जस्करन यानं सहा षटकार खेचले. वन डे क्रिकेटमध्ये हर्षल गिब्स आणि ट्वेंटी-२०त युवराज सिंग व किरॉन पोलार्ड यांनी एका षटकात सहा षटकार खेळण्याचा विक्रम केला आहे. प्रथम फलंदाजी करताना अमेरिकेच्या १० षटकांत ३ बाद २९ धावा झाल्या होत्या.
जस्करन मैदानावर उतरताच सारे चित्र बदलले. त्यानं ४८ चेंडूंत अर्धशतक आणि १०२ चेंडूंत शतक पूर्ण केले. शतकानंतरच्या पुढील ७३ धावा त्यानं फक्त २२ चेंडूत कुटल्या. या सामन्यात त्याला चारवेळा जीवदान मिळाले. त्यानं १२४ चेंडूंत नाबाद १७३ धावा केल्या. या कामगिरीसह त्यानं वन डे क्रिकेटमध्ये पाचव्या क्रमांकावर सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा एबी डिव्हिलियर्सचा विक्रम मोडला. त्याच्या या खेळीत ४ चौकार व १६ षटकारांचा समावेश होता.
अमेरिकेच्या ९ बाद २७१ धावांच्या प्रत्युत्तरात पापुआ न्यू गिनीचा संपूर्ण संघ ३७.१ षटकांत १३७ धावांवर माघारी परतला.
Web Title: Jaskaran Malhotra hits six sixes in an over against Papua New Guinea, becomes USA's first ODI centurion
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.