सुनील गावसकर लिहितात...अखेर आॅस्ट्रेलियन संघाने गुवाहाटीमध्ये गोलंदाजांना अनुकूल वातावरणाचा लाभ घेतला. पावसामुळे खेळपट्टी गोलंदाजांना अनुकूल झाली. कव्हर्समुळे खेळपट्टीमध्ये थोडा ओलावा होता. अचूक मारा करीत आॅस्ट्रेलियाने संधीचा लाभ घेतला. जेसन बेहरेन्डोर्फने उजव्या हाताच्या फलंदाजांविरुद्ध चेंडू चांगला स्विंग केला. रोहित शर्मा नेहमीइनस्विंग चेंडूवर चुकत असल्याचे निदर्शनास येते. या वेळीही इनस्विंग चेंडूवर त्याला पायाचा योग्य वापर करता आला नाही.त्याचप्रमाणे कर्णधार विराट कोहलीही वेगवान इनस्विंग मारा खेळण्यात अपयशी ठरला आणि टी-२० मध्ये प्रथमच खाते न उघडता माघारी परतला. त्यानंतर मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नात भारतीय फलंदाज ‘तू चल मी येतो’ याप्रमाणे तंबूत परतले. त्यामुळे मोठी भागीदारी शक्य झाली नाही.गुवाहाटीमध्ये भारतीय गोलंदाजांना विशेषत: फिरकीपटूंना आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले. आॅस्ट्रेलियन फलंदाजांनी आक्रमक पवित्रा स्वीकारीत भारतीय फिरकीचा खरपूस समाचार घेतला. हेन्रिक्स व हेड यांनी नैसर्गिक फलंदाजी केली. त्याचसोबत त्यांनी आॅस्ट्रेलियन फलंदाजी केवळ वॉर्नर व फिंच यांच्यावर अवलंबून नसल्याचे सिद्ध केले. हेन्रिक्सला तिसºया स्थानावर बढती देण्याचा निर्णय योग्य ठरला. कारण त्याला भारतीय वातावरणात खेळण्याचा पुरेसा अनुभव आहे आणि छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना विचारपूर्वक खेळणे अधिक उपयुक्त ठरते.गेल्या आठवड्यात हैदाराबादमध्ये पाऊस झाल्यामुळे क्युरेटरला मनाप्रमाणे खेळपट्टी तयार करण्याची संधी मिळाली नाही. अशास्थितीत खेळपट्टी गोलंदाजांसाठी अनुकूल ठरू शकते. विशेषत: बेहरेन्डोर्फ गुवाहाटी लढतीप्रमाणे हैदराबादमध्येही छाप सोडू शकतो. पाहुणा संघ विजयाने निरोप घेण्यास उत्सुक आहे. त्यामुळे पुढील महिन्यात प्रारंभ होणाºया अॅशेस मालिकेत त्यांना सकारात्मक मानसिकतेने तयारी करता येईल. (पीएमजी)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- जेसन बेहरेन्डोर्फने मालिका जिवंत ठेवली
जेसन बेहरेन्डोर्फने मालिका जिवंत ठेवली
अखेर आॅस्ट्रेलियन संघाने गुवाहाटीमध्ये गोलंदाजांना अनुकूल वातावरणाचा लाभ घेतला. पावसामुळे खेळपट्टी गोलंदाजांना अनुकूल झाली. कव्हर्समुळे खेळपट्टीमध्ये थोडा ओलावा होता.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 12:59 AM