इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) 13व्या मोसमाला सुरुवात होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिली आहेत. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर यंदा आयपीएल संयुक्त अरब अमिराती येथे खेळवण्यात येणार आहे. 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत शाहजाह, दुबई आणि अबु धाबी येथे सामने खेळवण्यात येणार आहेत. पण, अजूनही परदेशी खेळाडूंच्या सहभागाविषयी साशंकता आहे. त्यात गुरुवारी दिल्ली कॅपिटल्स संघाला धक्का देणारी बातमी समोर आली. इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉय यानं दुखापतीमुळे माघार घेतली. पण, रॉयच्या जागी संघात दाखल होणाऱ्या खेळाडूनं अन्य संघांच्या चिंतेत भर घातली आहे. (Jason Roy has also pulled out of the IPL 2020 for Delhi Capitals)
इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात ट्वेंटी-20 मालिका उद्यापासून सुरू होत आहे. पण, तत्पूर्वी खांद्याच्या दुखापतीमुळे जेसन रॉयनं या मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. ट्वेंटी-20 मालिकेसाठी सराव करताना जेसन रॉयला ही दुखापत झाली. पण, त्याची ही दुखापत आयपीएलमधील संघ दिल्ली कॅपिटल्ससाठी डोकेदुखी ठरला आहे. त्यानं आयपीएल 2020मधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. (Jason Roy has also pulled out of the IPL 2020 for Delhi Capitals)
पण, जेसनच्या जागी संघात दाखल होणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या अष्टपैलू खेळाडूनं बिग बॅश लीग गाजवली आहे. ऑस्ट्रेलियाचा डावखुरा जलदगती गोलंदाज डॅनिएल सॅम हा दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात दाखल होणार असल्याचे वृत्त ESPNcricinfoनं दिलं आहे. याआधी इंग्लंडचा अष्टपैलू ख्रिस वोक्सनंही माघार घेतली आणि त्याला बदली म्हणून दिल्लीनं दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज अॅनरीच नॉर्ट्झे याला ताफ्यात घेतले. आता त्यांनी सॅमच्या रुपानं आणखी एक जलदगती गोलंदाज संघात घेतला आहे. (Jason Roy has also pulled out of the IPL 2020 for Delhi Capitals)
जेसन रॉयसाठी दिल्लीनं 1.5 कोटी रुपये मोजले होते. सॅमचे हे पहिलेच आयपीएल सीजन आहे. न्यू साऊथ वेल्सच्या या गोलंदाजानं 2019-20च्या बिग बॅश लीगमध्ये सिडनी थंडर्स संघाचे प्रतिनिधित्व केलं आणि मोसमातील सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज म्हणून त्यानं नाव कमावलं. या कामगिरीच्या जोरावर त्यानं इंग्लंड दौऱ्यासाठीच्या ऑस्ट्रेलिया संघात स्थान पटकावलं आहे. त्यानं बिग बॅश लीगमध्ये 17 सामन्यांत 30 विकेट्स घेतल्या आहेत.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
आशियात अव्वल नंबर; कॅप्टन कोहलीला मिळाली आणखी एक 'गोड' बातमी!
विराट-अनुष्काच्या गोड बातमीवर बीसीसीआय, आयसीसीच्या हटके शुभेच्छा
विराट-अनुष्का बनणार आई-बाबा; इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरचं ट्विट होतंय व्हायरल, पण का?
'विरुष्का'नं दिली गोड बातमी अन् इथे नेटिझन्सनी लगावला मीम्सचा मास्टर स्ट्रोक!
IPL 2020 Schedule Update : दोन लेगमध्ये होणार आयपीएलचे सामने; जाणून घ्या कसं असेल वेळापत्रक!